लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यात धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर, आणि नागपूर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र राज्य सरकारने वेळेवर न्यायालयात इम्पेरिकल डेटा दिलेला नसल्याने ओबीसींना या निवडणुकीत आरक्षण मिळू शकलेले नाही. त्यामुळे राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण जाहीर होत नाही. तोपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना राज्यात ओबीसी आरक्षण नको, असल्याने त्यांनी मागासवर्गीय आयोग नेमूनदेखील कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप देखील या निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस भारती सोनवणे, ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय महाजन, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, महानगर चिटणीस राहुल वाघ, नगरसेवक राजेंद्र मराठे, महेश चौधरी, मनोज काळे, मंडल अध्यक्ष अजित राणे, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्ष रेखा पाटील, महिला मोर्चा दीप्ती चिरमाडे, महिला सरचिटणीस रेखा वर्मा, अरुण श्रीखंडे, तृप्ती पाटील, चंदू महाले, विजय बारी, शांताराम गावंडे, अमित देशपांडे, शुभम बावा, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, सचिन बाविस्कर, प्रथम पाटील, रितेश सोनवणे उपस्थित होते.