शेंदुर्णी, ता. जामनेर : येथील र. भा. गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. सेल व अविष्कार सेल आयोजित तीन दिवसीय आभासी संशोधन प्रशिक्षणाचा समारोप नुकताच झाला.
नंदुरबारच्या जी. टी. पाटील महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय चौधरी तसेच अविष्कारमध्ये प्राविण्य मिळालेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले. यात राष्ट्रीय पुरस्कार विजेते मनीषा चौधरी, राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदविलेले विद्यार्थी योगेश राठोड व सुमिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अविष्कार समन्वयक प्रा. डॉ. योगिता चौधरी यांनी तीन दिवसीय सत्राचा आढावा घेतला. राज्यशास्त्र विभागप्रमुख उपप्राचार्य डॉ. संजय भोळे यांनी अध्यक्षीय समारोप केला.
पायल बारी यांनी सूत्रसंत्रालन केले. प्रतीक्षा गुजर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. रेणुका गरुड यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वीततेसाठी आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. डॉ. दिनेश प्रकाश पाटील, प्रा. डॉ. सुजाता पाटील, प्रा. डॉ. वसंत पतंगे, प्रा. डॉ. भूषण पाटील, प्रा. डॉ. आजिनाथ जिवरग यांनी परिश्रम घेतले. संशोधन प्रशिक्षणासाठी एकूण ३१९ संशोधकांकडून नावनोंदणी करण्यात आली होती.