विजयकुमार सैतवालजळगाव : लेह लडाखनजीक सहाशे फूट खोल दरीत कार कोसळून जखमी झालेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी जळगावातील तीन व भुसावळ येथील दोन डॉक्टरांनी जीवाची बाजी लावून खोल दरीत उडी घेत दोन पोलिसांसह तीन जणांना जीवदान दिले. अत्यंत दुर्गम भागात झालेल्या या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून वेळीच मिळालेल्या मदतीमुळे इतर तिघांची प्रकृती सुधारली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.जळगाव येथील भूलतज्ज्ञ डॉ. नितीन खडसे, डॉ. धीरज चौधरी, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. दीपक पाटील व सी.ए. कपिल पाटील तसेच भुसावळ येथील जनरल सर्जन डॉ. विरेंद्र झांबरे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश चौधरी हे लेह लडाख येथे पर्यटनासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना लेहपासून शंभर किलोमीटर अंतरावरील तांगलाला पास या समुद्र सपाटीपासून सोळा हजार पाचशे फूट उंचावर असलेल्या ठिकाणी एक कार सहाशे मीटर खोल दरीत कोसळलेली दिसली.वैद्यकीय सेवाचा वसा जपलाकार कोसळल्यानंतर रस्त्यावर काही वाहनेदेखील थांबली होती. मात्र कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हते. त्या वेळी स्वत:जवळ उपचाराचे सर्व साहित्य असल्याने आपल्या वैद्यकीय सेवेचा वसा आपण जपलाच पाहिजे या भावनेतून या सर्व मंडळींनी या अतिदुर्गम खोल दरीत आपल्या जवळील औषधांसहीत उड्या घेतल्या. त्या वेळी त्यांना कारमधील सहा जणांपैकी एक मुलगी जागेवरच ठार झाल्याचे दिसून आले. इतर दोन जण ठिक होते मात्र इंडो तिबेटियन बॉर्डरचे दोन पोलीस व मुंबईची एक मुलगी जखमी झाली होती. पंजाबमधील पासिंग असलेल्या या अपघातग्रस्त कारमधील अत्यवस्थ रुग्णांवर या डॉक्टरांनी त्वरित उपचार केले.कृत्रिम श्वासोश्वासाची मदतअत्यंत उंचावर असलेल्या व बर्फवृष्टी होणाऱ्या या भागात आॅक्सिजनचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या शरीरातीलही आॅक्सिजन कमी होतो. अशा या दुर्गम भागात जखमींनाही आॅक्सिजनची गरज असताना या डॉक्टरांनी कृत्रिम श्वासोश्वास देत ट्रकद्वारे १० कि.मी.पर्यंत नेले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे ४५ कि.मी. अंतरावरील खारू येथे मिलिटरी हॉस्पिटल येथे दाखल केले. या वेळीच मिळालेल्या उपचारामुळे दोन पोलिसांसह मुंबईतील एका मुलीला जीवदान मिळाले.आयएमएचे सदस्य असलेल्या जिल्ह्यातील या डॉक्टरांनी अतीदुर्गम भागातही आपला वैद्यकीय सेवेचा वसा जपल्याबद्दल आयएमए जळगावचे नाव आणखी उंचावले असल्याचे आयएमएचे सचिव डॉ. विलास भोळे यांनी सांगितले.
लेह लडाखमधील थरार : जीव धोक्यात घालून जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरांनी वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:21 IST
सहाशे मीटर खोल दरीत उड्या घेत केले उपचार
लेह लडाखमधील थरार : जीव धोक्यात घालून जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरांनी वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण
ठळक मुद्देवैद्यकीय सेवाचा वसा जपलाकृत्रिम श्वासोश्वासाची मदत