शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
5
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
6
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
9
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
10
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
11
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
12
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
13
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
14
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
15
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
16
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
17
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
18
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
19
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
20
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 

रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करा, अन्यथा जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 9:40 PM

आयुक्तांना निवेदन : अन्याय विरोधी जनजागृती मंचची मागणी

जळगाव : कोरोना महामारीतून नागरिक सावरत तोवर नादुरस्त रस्त्यांमुळे कमरेसह मणक्याचा व मानेचा त्रास वाढला आहे. जागो-जागी चा-या खोदून ठेवण्यात आल्या असून त्यांची थातूर-मातूर दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रोज अपघात घडत आहेत़ त्यामुळे तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, अशा इशारा राज्य अन्याय विरोधी जनजागृती मंचतर्फे मनपा आयुक्तांना देण्यात आला आहे.शहरात भुयारी गटारीचे काम सुरू आहे़ यासाठी एल़सी़इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. च्यावतीने जेसीबीच्या सहाय्याने चा-या खोदण्यात आल्या आहेत. त्या चा-या व्यवस्थित बंद करून रस्ता पुर्वरत करणे अनिवार्य आहे. मात्र, या चा-यांची थातूर-मातूर दुरस्ती करण्यात आली असून रोलरच्या सहाय्याने मुरूमही दाबलेले नाही. त्यामुळे रस्ते उंच व सखल झाले आहेत़ वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणे देखील मुश्किल झाले असल्याचा आरोप राज्य अन्याय विरोधी जनजागृती मंचतर्फे करण्यात आला आहे. आता तर चा-यांमध्ये वाहने अडकून अपघात होत आहेत़ त्यात धुळीने जळगावकर हैराण झाले आहे. म्हणून चारीच्या कामांची पाहणी करण्यात यावी व तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी मंचच्यावतीने करण्यात आली आहे. त्वरित रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास जनआंदोलन पुकारण्यात येईल, त्याचबरोबर न्यायालयात दाद मागण्यासाठी दावा दाखल करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाJalgaonजळगाव