वरखेडी ता. पाचोरा : जवळच असलेल्या भोकरी ग्रामपंचायतीच्या इमारतीची डागडुजी करून रंगरंगोटी व नूतनीकरण करण्यात आले आहे. या इमारतीचे उद्घाटन भोकरी - वरखेडीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पं. स.चे माजी सभापती इस्माईल हाजी फकीर मोहंमद यांच्या हस्ते करण्यात आले.
तत्पूर्वी मौलाना अकील यांची अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भोकरीचे सरपंच मौलाना अरमान अब्दुल यांनी प्रस्तावना मांडली तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक हाजी इस्माईल फकीर महंमद यांनी सबका साथ सबका विकास या अनुषंगाने गावाचा विकास साधण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ गट-तट विसरून सहकार्य करण्यासाठी तयार आहोत, असे मत व्यक्त केले.
यावेळी वरखेडी-भोकरी ग्रा.पं. चे ग्रामविकास अधिकारी गजानन नन्नवरे, वरखेडीचे माजी सरपंच धनराज विसपुते, उपसरपंच धनराज पाटील, संजय पाटील, विजय भोई, भोकरी उपसरपंच असलम रूस्तम काकर, भोकरी ग्रा. पं. सदस्य जलील रफिक, अफसर शकुर, मुक्तार टेलर, अब्दुल मिठू शेख, सलिमभाई, सुफियान मुल्ला, माजी सरपंच डॉ. अल्ताफ शफी, डॉ. रशीद शब्बीर, रशीद उखर्डु, शफी सुलेमान, इरफान भिकारी, अमीर हमजा, गुलाब पठाण, संजय चौधरी, शफी शेठ, रफीक शेठ, गुलाम शेख, हाफीज अकील, हाफीज इमरान, गुलफाम शेख, सुलतान कुरेशी, मोहंमद सामनेरे, समलूभाई, उस्मान अमीर, हमीद बी. के., रशीद भोपाते, कय्युम कंडक्टर, लिपीक जमील पठाण आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार माजी सरपंच डॉ. अल्ताफ शफी यांनी मानले.