शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीचा काढला लपून-छपून व्हीडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 21:36 IST

जळगाव : बांधकाम कामगार तरूणाने बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी खोली दिलेल्या घरमालक तरूणीचाच लपून-छपून व्हीडिओ क्लिप बनविल्याची धक्कादायक प्रकार शहरात ...

जळगाव : बांधकाम कामगार तरूणाने बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी खोली दिलेल्या घरमालक तरूणीचाच लपून-छपून व्हीडिओ क्लिप बनविल्याची धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे़ याबाबत तरूणाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतिफ याकूब बेग (२०, रा़पिंप्राळा हुडको) असे व्हीडिओ बनविणाऱ्या भामट्याचे नाव आहे़ त्यास अटक करण्यात आली आहे़पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरूणी ही आई सोबत वास्तव्यास आहे़ तरूणीच्या घराशेजारी असलेल्या रहिवाशाचे बांधकाम सुरू आहे़ त्यामुळे सिमेंट व बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी तरूणीच्या आईने बांधकाम कामगारांना खोली दिली़ दरम्यान, शुक्रवारी सकाळी एक बांधकाम तरूणाने तरूणीच्या घराचा दरवाजा ठोठावला व नंतर त्या तरूणाने तरूणीला मेमरीकार्ड दिले व त्यात एक व्हीडिओ असल्याचे सांगितले़मेमरीकार्डमध्ये आपले व्हीडिओ असल्याचा संशय आल्याने भेदरलेली तरूणीने संपूर्ण प्रकार शेजारच्यांना फोन करून सांगितला़ त्यांनी तरूणीला संबंधित मेमरी कार्डमधील व्हीडिओ हा तिच्या लॅपटॉपमध्ये तपासण्याचा सल्ला दिला़ त्यात तिला तिचा लपून-छपून काढलेला एक मिनिटाचा व्हीडिओ त्यात दिसून आला़ तरूणीने लागलीच एमआयडीसी पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली़ काही वेळातच पोलिसांनी तरूणीच्या घरी धाव घेतली़ यावेळी पोलीस कर्मचारी मुकेश पाटील, हेमंत काळसकर, चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर, शांताराम पाटील यांनी त्या बांधकाम कामगार तरूणाला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव आतिफ याकूब बेग असे सांगितले़ त्यानंतर त्याला अटक करण्यात आली़ दरम्यान, याप्रकरणी त्या तरूणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव