शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांची प्रकरणे निकाली काढा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:22 IST

एन.मुक्ताचा आंदोलनाचा इशारा : वेतन निश्चिती प्रकरणांसाठी आर्थिक मागणीची तक्रार

जळगाव- उच्च शिक्षण विभागाकडून प्राध्यापकांच्या वेतन निश्चितीच्या प्रकरणांसाठी आर्थिक मागणी होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एन.मुक्ता संघटनेकडून नुकतेच सहसंचालक डॉ़ प्रशांत मगर यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करण्यात आली़ तसेच आठ दिवसात प्रकरणे निकाली काढावीत अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विभागातील महाविद्यालयीन व विद्यापीठा शिक्षकांचे सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात वेतन निश्चिती शिबीर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कुठलाही मोबदला न घेता विहित कालावधीत पार पाडले. त्यानंतर प्राध्यापकांची सर्व प्रकरणे सहसंचालक उच्च शिक्षक विभागात कार्यालयात जमा करण्यात आली. दरम्यान, महिना उलटला तरी देखील पुढील हालचाली झाल्या नाहीत. त्यातच वेतन निश्चितीच्या फाईलवर शिक्कयांसाठी किंवा इतर कामांसाठी तीन हजार रूपयांची उच्च शिक्षण विभागातून प्राध्यापकांना मागणी होत आहे. याबाबत काही प्राध्यापकांनी व प्राचार्यांनी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स असोसिएशन (एन.मुक्ता) या संघटनेकडे धाव घेऊन तोंडी तक्रारी दिल्या. या प्रकाराची दखल घेत एन.मुक्ता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.प्रशांत मगर यांची भेट घेऊन होणा-या विलंबाबात आणि आर्थिक मागणीबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच आठ दिवसात सर्व प्रकरणे निकाली काढावीत अन्यथा १९ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संघटनेकडून बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा दिला व त्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर संघटनेकडून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही निवदेनाची प्रत पाठविण्यात आली आहे.यांची होती उपस्थितीसहसंचालक डॉ़ मगर यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष प्रा.नितीन बारी, केंद्रीय सचिव डॉ.अविनाश बडगुजर , प्राचार्य डी.एस.सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष डॉ.प्रज्ञा जंगले, डॉ.संजय भैसे, कार्यालय मंत्री डॉ.केतन नारखेडे , डॉ.शेलार नगाव, प्रा.संजय पाटील, डॉ.गुंजाळ, प्रा. नितीन बडगुजर, प्रा.भगवान पटेल, बामखेडा, प्रा.किसन हिरोळे , तसेच जळगाव धुळे नंदुरबार येथील प्राध्यापक उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव