शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे नाव, नेत्यांचे फोटो तात्काळ काढा; संजय पवारांना जयंत पाटलांचा इशारा 

By सुनील पाटील | Updated: April 23, 2023 19:08 IST

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांना बॅनर काढण्याचे निर्देश दिले आहेत.

जळगाव : धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नाव व नेत्यांचे फोटो बॅनरवरुन तात्काळ काढावेत, अन्यथा आपणाविरुध्द कारवाई केली जाईल असा इशारा वजा आदेश राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांना दिले आहेत.

येत्या २८ एप्रिल रोजी धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलच्या वतीने निवडणूक लढवित आहात असे बॅनर पवार यांनी लावलेले आहे. आपण पक्षामध्ये कोणत्याही पदावर कार्यरत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणताही गट नाही, असे असताना संजय पवार गट असा उल्लेख करून आपण पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहात. त्यामुळे तातडीने राष्ट्रवादी पक्षाचे नाव व नेत्यांचे फोटो काढावेत, अन्यथा आपल्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशाच्या पत्रात म्हटले आहे. संजय पवार यांनी भाजप-शिंदे गटाशी हातमिळवणी करुन जिल्हा बँकेत चेअरमनपद मिळवले आहे. राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही हातची सत्ता गेल्याने राष्ट्रवादी पक्षात पवारांविषयी प्रचंड असंतोष आहे. त्यापार्श्वभूमीवर जयंत पाटील यांचे आदेश महत्वपूर्ण मानले जात आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावJayant Patilजयंत पाटील