शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

भुसावळकरांनी जपला आठवणींचा ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:34 IST

डी.एस. हायस्कूलच्या मैदानावर झाली होती सभा

ठळक मुद्देवाचनालयाची केली होती पाहणीरेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्या थांबण्याची सोय

पंढरीनाथ गवळी / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ -भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भुसावळ व तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे दिलेल्या भेटीच्या स्मृती-आठवणी आजही त्यांच्या अनुयासह भुसावळकरांमध्ये ताज्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेकर यांचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवानंतरचे दुसरे वर्ष आहे. त्यामुळे त्यांच्या भुसावळ येथील भेटीला विशेष महत्त्व आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर १९५२ मध्ये भुसावळात आले होते व त्यांची डी. एस.हायस्कूलच्या प्रांगणावर जाहीर सभा झाली होती, अशी आठवण जुने लोक सांगतात. बाबासाहेबांचे दिल्लीहून भुसावळात रेल्वेने आगमन झाले. त्यांच्यासोबत त्यांची ग्रंथसंपदा असलेली पेटी होती. ती सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती, अशी आठवण काही वर्षापूर्वी स्व. एन. डी. खरात यांनी ‘लोकमत’ला सांगितली होती. बाबासाहेबांसोबत दादासाहेब रुपवते आदी विभुती होत्या, असेही त्यांनी सांगितले होते.सभेच्या आधी त्यांनी तापी रोडवरील (यावल रोड) विश्रामगृहात विश्रांती घेतली होती. यानंतर ते रेल्वे चाळीतील यंग मेन्स असोसिएशनच्या सार्वजनिक वाचनालयात आले त्यांनी वाचनालयाची पाहणी केली. त्यावेळी कांबळे नावाचे खानसामा होते. स्वयंपाक करण्यात ते तरबेज होते. जेवण घेतल्यानंतर बाबासाहेबांनी त्यांचे कौतुक केले व शाबासकी दिल्याचीही आठवण सांगितली जाते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चाळीसगावला आले होते. दादासाहेब गायकवाड, शांताबाई दाणी, पी. जे. रोहम,अण्णासाहेब लयंकर अशा सत्यग्रहींना धुळे येथे अटक करण्यात आली होते त्यांना सोडविण्यासाठी बाबासाहेब आले होते. त्यावेळी त्यांची चाळीसगावला सभा झाली होती. माजी मंत्री डी.डी.चव्हाण यांचे वडील दिवाण सीताराम चव्हाण यांनी सभेचे आयोजन केले होते. चाळीसगाव येथे श्यामराव कामाजी जाधव या न शिकलेल्या तरुणावर बाबासाहेबांचा लोभ होता. ते त्याला नावानिशी ओळखत होते, अशीही आठवण सांगितली जाते. चाळीसगाव रेल्वेस्थानक पूर्वी अगदी लहान होते. त्याठिकाणी बाबासाहेब रेल्वेने उतरले व जवळच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्या थांबण्याची सोय करण्यात आली होती. बाबासाहेब फैजपूर,ता.यावल येथेही येऊन गेल्याची आठवण सांगितली जाते.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीJalgaonजळगाव