कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील धार्मिक स्थळे ३१ मार्चपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:27 PM2020-03-19T12:27:41+5:302020-03-19T12:28:25+5:30

गर्दी न करण्याचे आवाहन

Religious sites in Jalgaon district closed till March 3 to prevent the outbreak of Corona | कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील धार्मिक स्थळे ३१ मार्चपर्यंत बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील धार्मिक स्थळे ३१ मार्चपर्यंत बंद

Next

जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनेंतर्गत जिल्ह्यात जेथे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे अशी सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये याकरीता नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे.
सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात कोरोना बाधीत, संशयित रूग्ण आढळून आल्यास त्याला तात्काळ पोलीस अथवा स्थानिक प्रशासनाच्या मदतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे दाखल करून त्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्याबाबत कार्यवाही करावी तसेच लोकांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावोगावी जजजागृती करावी आणि आपआपल्या क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकता नसेल तेव्हा प्रवास टाळणे, शिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यास सांगावे, अशा सूचना अपर जिल्हादंडाधिकाºयांनी सर्व संबंधित अधिकाºयांना दिल्या आहेत.

Web Title: Religious sites in Jalgaon district closed till March 3 to prevent the outbreak of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव