शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातून आणलेल्या ६७ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:17 IST

तीन जणांवर गुन्हा ; पाच जनावरांचा मृत्यू

जळगाव : परराज्यातून आणलेल्या ६७ जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री वरणगावात सुटका केली. या पशुधनाला कोंबलेले असल्याने पाच जनावरे मृत झालेली आढळून आली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेख वसीम शेख यासीन, बशीर कुरेशी उर्फ चढ्ढा (रा.वरणगाव, ता.भुसावळ) व ट्रक मालक शेर मोहम्मद जाकीर हुसेन (रा.बेरजाली, महिदपुर जि.उज्जैन, मध्य प्रदेश, ह.मु.धुळे) या तीन जणांविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरणगाव येथे ट्रक भरुन जनावरे आणण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना मिळाली होती.त्यानुसार उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम, सहायक निरीक्षक सागर शिंपी, सारिका कोडापे, अनिल इंगळे, रवींद्र गिरासे, सुनील दामोदरे, दत्तात्रय बडगुजर, रवींद्र चौधरी, संतोष मायकल, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे व किरण चौधरी यांचे पथक शुक्रवारी रात्री वरणगावला रवाना केले होते. या पथकाने इमाम कॉलनी भागात जावून ट्रकला घेरले, मात्र पोलीस वाहन पाहताच चार चाकी वाहनातून संशयित पसार झाले. त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले.क्रुरतेने कोंबले जनावरेपोलिसांनी ट्रक (क्र.एम.एच.१८ बी.जी.०३१५) ताब्यात घेतला. त्यात अतिशय क्रुरतेने जनावरे कोंबून भरलेली होती. लहान मोठे असे ६७ जनावरे त्यात होती. दरम्यान, प्रवासात ५ जनावरांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयितांविरुध्द महाराष्टÑ प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सन २०१५ सुधारीत) चे कलम ५,५ (अ), ५ (ब), ९,११ प्राण्यांना निर्दयनतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ (ड),(ई), (फ) मोटार वाहन कायदा कलम १८३(१),(२),(अ), १७९, १७७ व कलम ४२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव