शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराच्या नावाने बनावट पावती पुस्तक छापून वसुली, एकाला पकडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 20:21 IST

बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेकडून भांडाफोड

ठळक मुद्देसाईचैतन्य बहुउद्देशीय संस्था व विश्व हिंदू परिषद द्वारा संचलित जळगाव या नावाने पावती पुस्तक तयार करण्यात आले असून त्यावर १४ फेब्रुवारी ते १४ एप्रिल २०२१ विधी समर्पण अभियान असा उल्लेख छापण्यात आलेला आहे.

जळगाव : राम मंदिर उभारणीसाठी बनावट पावती पुस्तक छापून देणगी वसूल करणाऱ्या राजेंद्र भास्करराव सोनवणे (४७,रा.चाळीसगाव घाट) याला गुरुवारी दुपारी गोलाणी मार्केट परिसरात पकडण्यात आले. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा भांडाफोड केला असून सोनवणे याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

साईचैतन्य बहुउद्देशीय संस्था व विश्व हिंदू परिषद द्वारा संचलित जळगाव या नावाने पावती पुस्तक तयार करण्यात आले असून त्यावर १४ फेब्रुवारी ते १४ एप्रिल २०२१ विधी समर्पण अभियान असा उल्लेख छापण्यात आलेला आहे. हे पावती पुस्तक हस्तगत करण्यात आले असून त्यावर ४००, ५० व १० रुपयाच्या पाच पावत्या फाडण्यात आलेल्या आहेत. गोलाणी मार्केटमध्ये दुपारी तीन वाजता सोनवणे पावत्या फाडत असल्याचे काही संघटनांच्या प्रतिनिधींच्या लक्षात आले. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक राकेश कांतीलाल लोहार,राजेंद्र देविदास नन्नवरे व देवेंद्र दुर्गादास भावसार व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन राजेंद्र सोनवणे याची चौकशी केली असता सर्वच प्रकार संशयास्पद वाटला. राम मंदिर बांधकामाच्या नावाने तो लोकांची फसवणू करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन थेट शहर पोलीस ठाण्यात आणले.

देणगीसाठी समिती गठीतअयोध्या येथे राम मंदिर उभारण्यासाठी निधी संकलित केला जात आहे. त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र कॅम्प कार्यालय, राजकोट, अयोध्या यांच्या नावाने १०० रुपयांची पावती फाडली जात आहे. त्याव्यतिरिक्त कोणाला वेगळी किंवा जास्त रक्कम द्यावयाची असल्यास वेगळी पावती असते.जळगाव शहरात श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमार्फतच देणगी स्विकारुन ती अयोध्या येथील राम मंदिराच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यासाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी अशी मोहीम आहे. राजेंद्र सोनवणे याच्याकडील पावती पुस्तकातच तफावत आहे.राकेश कांतीलाल लोहार यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :JalgaonजळगावRam Mandirराम मंदिरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ