शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय हळद आणि गोड मक्यापासून घेतले विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:32 IST

कृषीभूषण राजेश पाटील यांचा उपक्रम : जळके येथे शेतीत यशस्वी प्रयोग, पांरपारिक पीक पध्दतीला फाटा

सुनील पाटीलजळगाव : पारंपारिक पीक पध्दतीला फाटा देत सेंद्रीय पध्दतीची शेती करुन जळके (ता.जळगाव) येथील शेतकरी कृषीभूषण राजेश पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सेंद्रीय हळद, पपईसोबत गोड मधू मका या पिकांचे विक्रमी उत्पादन राजेश पाटील यांनी घेतले असून सेंद्रीय शेतीमुळे त्यांना राज्य शासनाने कृषीभूषण पुरस्कारानेही गौरविले आहे.राजेश पाटील यांच्याकडे स्वत:ची ६० एकर तर कराराची ४५ एकर अशी एकूण १०५ एकर शेती आहे. पाटील यांचा नेहमीच पांरपारिक पीक पध्दतीला फाटा देत नवीन पध्दत अवलंबण्याकडे कल असतो. रासायनिक पिकांचा आरोग्यावर होणार दुष्पपरिणाम पाहता त्यांनी सेंद्रीय शेतीचा पर्याय निवडला.डाळींब, पपई आणि हळद हे तीन पीके त्यांनी सेंद्रीय पध्दतीने लागवड करुन विक्रमी उत्पादन घेतले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल कृषी विभागाने घेतली. २००६ मध्ये तत्कालिन राज्यपाल, मुख्यमंत्री विलासराव देशमुख व कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते त्यांना नागपूर येथे कृषीभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. २००३ पासून ते सेंद्रीय हळदीचे उत्पादन घेत आहेत.

योग्य नियोजन करुन संयम राखणे आवश्यकआदर्श शेतकरी व कमी खर्चात विक्रमी उत्पादन घ्यावयाचे असेल तर शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करुन संयम राखणे आवश्यक आहे. उत्पादीत झालेल्या मालाला भाव नसेल तर त्याची साठवण करुन मागणीच्या वेळी पीक विक्रीला काढले तर चांगला भाव मिळतो. त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. सेंद्रीय हळद व गोड मधू मक्याचे उत्पादन घेणारे राजेश पाटील हे तालुक्यातील पहिले शेतकरी आहेत. सद्यस्थितीत त्यांनी साडे चार एकरात गोड मक्याची लागवड केली असून तितक्यात एकरात हळदीची लागवड केली आहे. कोरडी झाल्यानंतरच हळद बाजारात विक्री काढली तर उत्तम भाव मिळतो असे पाटील यांचे म्हणणे आहे. पाटील यांनी ३० एकर सेंद्रीय उसाची लागवड करुन स्वत:च गुळ निर्मिती केली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव