शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जळगाव जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे १९ कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:27 IST

जिल्ह्यातील दोघा खासदारद्वयींनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यापैकी २३ हजार शेतकºयांची १९ कोटी ५४ लाख ५७ हजार ५०४ रूपये ही रक्कम बँकेच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात आली असून तसेच पत्रच ओरियंटल इन्शुरन्स कंपनीने दिले आहे.

ठळक मुद्देखासदार ए.टी.पाटील व रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यशअनेक महिन्यांपासून सुरू होता पाठपुरावाओरियंटल इन्शुरन्स कंपनीने दिले पत्र

जळगाव : पंतप्रधान पीक विमा योजना खरीप २०१७ मधील १६ हजार शेतकरी व फळ पीक विम्यातील वंचित १८०० शेतकºयांना पीक विमा भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले होते. याखेरीज राष्टÑीयकृत बँकामधील ७ हजार शेतकरीही वंचित होते. त्यासाठी जिल्ह्यातील दोघा खासदारद्वयींनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यापैकी २३ हजार शेतकºयांची १९ कोटी ५४ लाख ५७ हजार ५०४ रूपये ही रक्कम बँकेच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात आली असून तसेच पत्रच ओरियंटल इन्शुरन्स कंपनीने दिले आहे.जिल्ह्यातील पंतप्रधान पीक विमा योजना खरीप २०१७ मधील १६ हजार शेतकरी तर आंबिया बहर फळपीक योजना २०१७ मधील १८०० वंचित शेतकरी सभासद यांना पीकविमा नुकसान भरपाई मिळणे साठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार खासदार ए. टी. पाटील व खासदार रक्षा खडसे यांच्या समवेत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, महाव्यवस्थापक एम.टी.चौधरी यांनी राधामोहन सिंह यांची तसेच कृषी विभागाचे सचिव आशिष कुमार भूतानी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील वंचित शेतकरी सभासद यांना त्वरित विमा मिळण्यासंदर्भात बाजू मांडली. त्यावर कृषी मंत्री यांनी संबंधित विभागांना त्वरित सदरचा विषय मार्गी लावण्यासाठी आदेश दिले.या आदेशानुसार द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा सहकारी बँकेच्या १६ हजार शेतकºयांसाठी आणि इतर राष्ट्रीयीकृत बँकांच्या ७ हजार शेतकºयांसाठी सुमारे १९ कोटी ५४ लाख ५७ हजार ५०४ एवढी रक्कम जमा केल्याचे पत्र आज दिले आहे. त्यात जिल्हा बँकेच्या शेतकºयांसाठी १८ कोटी ५० लाख ५ हजार ३८५, तर बँक आॅफ बडोदा जानवे शाखेसाठी ७ लाख ५४ हजार ११६ रूपये, देना बँक अमळनेर शाखेसाठी ५० लाख ७३ हजार ९१८ रूपये, नेरी बाजार शाखेसाठी ४२ हजार १७४, निंभोरा शाखेसाठी १ लाख ५७ हजार ५७४ रूपये, पंजाब नॅशनल बँकेच्या अमळनेर शाखेसाठी २५ हजार ७८ रूपये, तर युनियन बँक अमळनेर शाखेसाठी ४३ लाख ९९ हजार २५६ रूपये आले आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाJalgaonजळगाव