शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दर्जेदार आरोग्य सेवेची माफक अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:29 IST

जळगावात वैद्यकीय संकूल उभारणीसह स्वतंत्र महिला रुग्णालय

विजयकुमार सैतवालजळगावात वैद्यकीय संकूल उभारणीसह स्वतंत्र महिला रुग्णालय उभे राहत असल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेल्या जळगाव जिल्हावासीयांना आता दर्जेदार आरोग्य सेवेची माफक अपेक्षा आरोग्य विभागासह वैद्यकीय शिक्षण विभागाकडून केली जात आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगावातील जिल्हा रुग्णालयात रिक्त पदे, सुविधांचा अभाव यासह वेगवेगळ््या कारणांनी येथे आरोग्य सेवेबाबत नेहमी ओरड होते. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांचीही बिकट स्थिती आहे. त्यामुळे आरोग्य सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली जाते. त्यानंतर आता जळगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याने येथे विविध पॅथींची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सोबतच मोहाडी रस्त्यावर स्वतंत्र महिला रुग्णालय आकाराला येत आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडून येत असल्याने आरोग्य सेवेत सुधारणा होणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जळगावात  वैद्यकीय संकुलास मंजुरी मिळण्यासह  महिला रूग्णालयाच्या कामालाही गती मिळाली असल्याने महिला रुग्णांची सोय होणार आहे. मेडीकल हब हे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. तर हे महिला रूग्णालय आरोग्य विभागाच्या म्हणजेच जिल्हा रूग्णालयाच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. रूग्णालयाचे एकूण अंदाजपत्रक सुमारे ५० कोटींचे आहे. पहिल्या टप्प्यात रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून दुसºया टप्प्यात कर्मचारी निवासस्थानांचे काम केले जाणार आहे. एकूणच आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यावतीने मोठी सुविधा उपलब्ध होत असली तरी ती लवकर मार्गी लागून दर्जेदार सेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव