शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वाचनाने मन समृद्ध होईल- निवृत्ती महाराज इंदुरीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:24 IST

वाचनाने मन समृद्ध होईल व ते आजच्या पिढीने करावे. अन्यथा येणारा काळ खूप भयानक असल्याचे संकेत राष्टÑीय कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी येथे कीर्तनात सांगितले.

ठळक मुद्देएरंडोल येथील कीर्तनात केला युवकांच्या कार्याचा गौरवविविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

एरंडोल, जि.जळगाव : वाचनाने मन समृद्ध होईल व ते आजच्या पिढीने करावे. अन्यथा येणारा काळ खूप भयानक असल्याचे संकेत राष्टÑीय कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी येथे कीर्तनात सांगितले.एरंडोल येथे रा.ति. काबरे विद्यालयाच्या प्रांगणात मैत्रेसेवा फाउंडेशनतर्फे कल्पतरु वाचनालय अभियानाच्या प्रथम चरणाच्या सांगतेप्रसंगी आयोजित समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमात कीर्तन करताना ते बोलत होते.यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्ष नितीन चौधरी, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, उद्योजक संजय काबरा, कुशल तिवारी, नगरसेवक, व्यापारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी सत्य व ज्ञानाबद्दल बोलताना अभंगाची संपूर्ण माहिती देत त्यांच्या अध्यायाच्या आधारावर मूुर्ख माणसाला समाजात मान मिळाल्याने सज्जनांना त्रास होत असल्याचे सांगितले. याचबरोबर माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी खासदार निधीतून पाच लाख रुपये, तर आमदार चिमणराव पाटील यांनी १० लाख रुपये निधी मैत्री सेवा फाउंडेशनच्या वाचनालयाला निधी देण्याचे जाहीर केले तर सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, संजय काबरा, दशरथ महाजन मित्र मंडळातर्फे कुशल तिवारी, डॉ.प्रशांत पाटील, समाधान पाटील आदींनीसुद्धा यावेळी मैत्री सेवा फाउंडेशनच्या वाचनालय बांधकामास रोख पैशांच्या व वस्तूंच्या रुपात देणगी देण्याचे यावेळी जाहीर केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतुल महाजन, नगरसेवक कुणाल महाजन, नीलेश परदेशी, प्रशांत महाजन, आकाश महाजन, नगरसेवक अभिजित पाटील, संघरत्न गायकवाड, जितेंद्र महाजन, अमोल तंबोली, नगरसेवक योगेश महाजन, प्रमोद महाजन, महेंद्र चौधरी, सचिन महाजन, स्वप्नील महाजन यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज पाटील, तुषार महाजन, करण पाटील, शुभम महाजन, मनोज महाजन, साहिल पिंजारी, ज्ञानेश्वर महाजन, श्यामसिंग पाटील, हरेश चौधरी, संतोष जैस्वाल, विनीत पाटील, हेमंत पाटील, कुलदीप पवार, गौरव महाजन, निखिल शेंडे, निखिल बाकळे, प्रीतेश पाटील, आदित्य पाटील, रोशन महाजन, जयवीर पाटील, सचिन पाटील, देवेंद्र पाटील, चेतन शिंपी यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन किशोर मोरणकार, प्रास्ताविक पीयूष चौधरी तर आभार सागर महाजन यांनी मानले.

टॅग्स :SocialसामाजिकErandolएरंडोल