आधी विक्री केलेल्या प्लॉटची पुन्हा केली विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 11:21 AM2017-10-11T11:21:54+5:302017-10-11T11:24:41+5:30

आधी दुसºया व्यक्तीला विक्री केलेल्या प्लॉटचा जुना उतारा काढून तोच प्लॉट पुन्हा १ लाख ८० हजार रुपयात विक्री करुन दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी करुन कल्पेश अरुण फालक (वय ३२ रा. चंद्रप्रभा हौसिंग सोसायटी, ख्वॉजामिया दर्ग्याजवळ, जळगाव) या तरुणाची जळगाव येथीलच वरद विनायक प्रॉपर्टीचे संचालक सत्यशिल अरुण अकोले (रा.पुर्णवाद नगर, जळगाव) यांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अकोले यांच्याविरुध्द औरंगाबाद शहर चौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Re-sale of plots sold earlier | आधी विक्री केलेल्या प्लॉटची पुन्हा केली विक्री

आधी विक्री केलेल्या प्लॉटची पुन्हा केली विक्री

Next
ठळक मुद्देसत्यशिल अकोलेविरुध्द औरंगाबाद शहर चौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखलएकाच प्लॉटच्या दोन उताºयांवर खरेदीखत १ लाख ८० हजारात झाली फसवणूक

आॅनलाईन लोकमत

जळगाव दि,११: आधी दुसºया व्यक्तीला विक्री केलेल्या प्लॉटचा जुना उतारा काढून तोच प्लॉट पुन्हा १ लाख ८० हजार रुपयात विक्री करुन दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी करुन कल्पेश अरुण फालक (वय ३२ रा. चंद्रप्रभा हौसिंग सोसायटी, ख्वॉजामिया दर्ग्याजवळ, जळगाव) या तरुणाची जळगाव येथीलच वरद विनायक प्रॉपर्टीचे संचालक सत्यशिल अरुण अकोले (रा.पुर्णवाद नगर, जळगाव) यांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अकोले यांच्याविरुध्द औरंगाबाद शहर चौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सत्यशिल अकोले यांचा वरद विनायक प्रॉपर्टी नावाने प्लॉट विक्रीचा व्यवसाय आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील हिरापूर येथे ग्रामपंचायत हद्दीत त्यांचे गट क्र.४३ मधील प्लॉट क्र.११ व २२ असे दोन प्लॉट होते. अशी केली फसवणूक हे प्लॉट खरेदी करण्यासाठी अकोले व कल्पेश फालक यांच्यात १ लाख ८० हजार रुपयात व्यवहार झाला. त्यानुसार २८ आॅक्टोबर २०१० रोजी हे दोन्ही प्लॉट अकोले यांनी औरंगाबाद येथील दुय्यम निबंधक कार्यालयात फालक यांना खरेदी करुन दिले. या खरेदीच्यावेळी अकोले यांनी गट क्र.४८ चा २००६/०७ चा ७/१२ उतारा जोडला होता. एकाच प्लॉटचे दोन वेगवेगळ्या उताºयावर खरेदी करुन अकोले यांनी फसवणूक केल्याचे उघड झाले.

अशी उघड झाली घटना

फालक यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद ७/१२ उताºयावर घ्यायची असल्याने त्यांनी आॅनलाईन ७/१२उतारा पाहिला असता त्यावर प्लॉट क्र.११ हा प्रमोद भगीरथ शर्मा (रा.दादावाडी, जळगाव) यांच्या तर प्लॉट क्र.२२ ला कंचन भगीरथ शर्मा यांच्या नावाची नोंद आढळून आली. हा प्रकार पाहिल्यानंतर फालक यांनी औरंगाबाद दुय्यम निबंधक कार्यालयात जावून नकला काढल्या असता अकोले यांनी हा प्लॉट विक्री करताना २००९/१० चा उतारा जोडल्याचे दिसून आले.११ जानेवारी २०१० रोजीच हा प्लॉट खरेदी झालेला होता. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर फालक यांनी ६ आॅक्टोबर रोजी औरंगाबाद शहर चौक पोलीस स्टेशन गाठून अकोले यांच्याविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार अकोले यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Re-sale of plots sold earlier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.