शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत रेमण्डचा तरुण कर्मचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:08 IST

दुचाकीने भुसावळकडे जात असताना समोरुन येणाºया ट्रकने जोरदार धडक दिल्याने तुषार भागवत पाटील (वय २९) हा तरुण जागीच ठार झाला तर दिलीप गोपाळ पाटील (३० दोन्ही रा.जळगाव खुर्द ) हा तरुण जखमी झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी साडे चार वाजता महामार्गावर गोदावरी वैद्यकिय महाविद्यालयसमोर झाला. तुषार हा रेमण्ड कंपनीत फिटर म्हणून कामाला होता.

ठळक मुद्देभुसावळला जात असताना अपघात गोदावरी महाविद्यालयाजवळ ट्रकने दिली दुचाकीला धडक एक जखमी 

जळगाव : दुचाकीने भुसावळकडे जात असताना समोरुन येणाºया ट्रकने जोरदार धडक दिल्याने तुषार भागवत पाटील (वय २९) हा तरुण जागीच ठार झाला तर दिलीप गोपाळ पाटील (३० दोन्ही रा.जळगाव खुर्द ) हा तरुण जखमी झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी साडे चार वाजता महामार्गावर गोदावरी वैद्यकिय महाविद्यालयसमोर झाला. तुषार हा रेमण्ड कंपनीत फिटर म्हणून कामाला होता.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तुषार पाटील व दिलीप पाटील हे दोन्ही जण रविवारी सायंकाळी दुचाकीने भुसावळकडे जात असताना गोदावरी वैद्यकिय महाविद्यालयाच्यासमोर भुसावळकडून येणाºया ट्रकने दुचाकीला धडक दिली. डोक्याला जबर मार लागल्याने तुषार जागीच गतप्राण झाला. अपघातानंतर दोघांना जवळील गोदावरी महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तुषारला मृत घोषीत केले. नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर रात्री मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. अपघातातील वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तुषारच्या वडीलांचेही याआधी निधनतुषार पाटील याचे वडील भागवत किसन पाटील यांचे २०११ मध्ये निधन झाले आहे. २०१२ पासून तो रेमण्ड कंपनीत कामाला होता. लहान भाऊ मुकेश हा देखील खासगी काम करतो. आई निर्मला गृहीणी असून बहिण उज्ज्वला नेहते ही विवाहित असून भुसावळ येथे दिलेली आहे. तुषार अविवाहित होता. दिलीप हा त्याचा जीवलग मित्र होता, दोन्ही कुठे जात होते ही माहिती समजू शकली नाही. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रेमण्ड कामगार व खेडी खुर्द येथील ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव