विवरे, ता.रावेर, जि.जळगाव : विवरे बुद्रूक येथे गटारी नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येने त्रस्त झालेल्या अजंदा रोड भागातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली आणि सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला.अजंदा रोड भागातील वॉर्ड क्रमांक पाचमधील गट नं. १०५८ मध्ये गटारींची समस्या कायम आहे. पावसाळयात व रोज सांडपाण्याची गंभीर समस्या या भागातील रहिवाशांना सामोरे जावे लागते. ही समस्या नेहमीच होते. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा वळवला. या प्रश्नावर ग्रामस्थांनी सरपंचांना जाब विचारला व होत असलेली गैरसोय दूर करण्याची मागणी केली.गटारीची समस्या येत्या महिना अखेरपर्यंत सोडवण्यात येणार येईल. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे. ज्यांचे अतिक्रमण असेल त्यांनी काढूून घ्यावे, असे ग्रामस्थांना सांगितले.-सुनीता बिसन सपकाळ,सरपंच, विवरे बुद्रूक, ता.रावेर२०१५ पासून ग्रामपंचायतला लेखी स्वरूपात वेळोवेळी कळविले आहे. २०१७ मध्ये ग्रामसभेतदेखील विषय घेऊनसुद्धा अद्याप कोणतेही दखल ग्रामपंचायतीने घेतलेली नाही. सांडपाण्याचा गंभीर विषय आहे. यापासून रोगराई पसरते. डासांचा प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यासाठी गटारी बांधण्याची आमची मागणी आहे.- ललित पाटील, रहिवासी, विवरे बुद्रूक, ता.रावेर
रावेर तालुक्यातील विवरे येथे सांडपाण्यावरून ग्रामपंचायतीत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 17:02 IST
विवरे बुद्रूक येथे गटारी नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येने त्रस्त झालेल्या अजंदा रोड भागातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली
रावेर तालुक्यातील विवरे येथे सांडपाण्यावरून ग्रामपंचायतीत धडक
ठळक मुद्देसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना घेरावनिर्माण झालाय आरोग्याचा प्रश्न