रावेरला स्वामी विवेकानंद विद्यामंदिराचे स्नेहसंमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 03:02 PM2020-01-13T15:02:06+5:302020-01-13T15:03:30+5:30

श्री स्वामी विवेकानंद विद्यामंदिराच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

Raver cheered for Swami Vivekananda Vidya Mandir | रावेरला स्वामी विवेकानंद विद्यामंदिराचे स्नेहसंमेलन उत्साहात

रावेरला स्वामी विवेकानंद विद्यामंदिराचे स्नेहसंमेलन उत्साहात

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांंनी उपस्थित प्रभावितपालकांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक

रावेर, जि.जळगाव : येथील श्री स्वामी विवेकानंद विद्यामंदिराच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांंनी उपस्थित प्रभावित झाले. पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार राहुल रनाळकर यांनी केले. प्रारंभी नगराध्यक्ष दारा मोहंम्मद, शेखर पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, हरीश गणवानी, शीतल महाजन, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, ओंकार पवार, लीलाबाई पवार, अनिता पवार, सचिव मनीषा पवार, निर्मला पवार यांनी श्री सरस्वती, स्वामी विवेकानंद, स्व.राजाराम पवार यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पवार यांनी केले. मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. दरम्यान, स्वामी ग्रुपच्या बालवाडीपासून कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या उपजत कला गुणांचा डिजिटल पडद्याच्या पार्श्वभूमीवर विविधरंगी प्रकाशझोतात अविष्कार घडवला.
यावेळी पालक, रसिक श्रोत्यांनी पाल्यांना भरभरून दाद दिली. गायत्री गिरी व चेतन चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. आभार मुख्याध्यापक राजेंद्र पवार यांनी मानले.

Web Title: Raver cheered for Swami Vivekananda Vidya Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.