शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

रावेर होतेय श्री गणेशमूर्तींची मोठी बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 15:43 IST

रावेर : सुरत, औरंगाबाद, जालना, एरंडोल व बºहाणपूरला होतेय तब्बल २१ फुट उंचीच्या मूर्तीची निर्यात

ठळक मुद्देविविध रुपांतील मूर्ती ठरताहेत लक्षवेधीअभिजात मूर्तीकलेला दिला आयामकलाविष्काराने गणेश भक्तांवर घातली मोहिनी

रावेर, जि.जळगाव : खान्देश, विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील गणेशभक्तांसाठी रावेर येथील मोरे प्रतिष्ठानने मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. बºहाणपूर येथून भव्य, उंच व सुबक अशा विघ्नहर्त्याच्या मूर्ती आणण्याऐवजी आता थेट रावेर येथून मध्य प्रदेश, गुजरात, खान्देश, विदर्भ व मराठवाड्यात ‘श्री’च्या मूर्र्ती निर्यात होऊ लागल्याने श्री गणेशभक्तांसाठी रावेरची मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.तिसऱ्या पिढीच्या पूर्वजांनी अमरावतीहून बºहाणपूरच्या उद्योग नगरीत स्थलांतर करून श्री विघ्नहर्ता व आदीशक्तीच्या विविध रूपकांच्या मूर्तीकलेचा व्यवसाय थाटला होता. बाबूराव मोरे यांनी मूर्तीकलेचे लावलेले रोपट्याचा मूर्तिकार राजेश मोरे यांनी आधुनिकतेची कास धरून जे.जे.कॉलेज आॅफ आर्ट्समध्ये कलाशिक्षणाचे धडे घेतलेल्या त्यांच्या थोरल्या भावाकडून अंगी अभिजात असलेल्या मूर्तिकलेला नवा आयाम दिला आहे. लालबागचा राजा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अष्टविनायक, दशावतारी श्रीगणेश, रथावर आरूढ श्रीगणेश, श्री शिवावतारातील, श्रीकृष्ण रूपातील, श्री दत्तावतारातील श्रीगणेश मूर्ती, अशा विविध कलाकुसरातील गणेशभक्तांच्या मनाला भावणारे श्री गणेश व दुर्गा रूपकांच्या मूर्र्तींनी खान्देश, विदर्भ, मराठवाडा, गुजरात व मध्य प्रदेशात मोरे प्रतिष्ठानच्या कलाविष्काराने श्रीगणेशभक्तांवर एकच मोहिनी घातली आहे.त्यांचे सुपुत्र सुनील मोरे, अक्षय मोरे यांनी त्यांचे आजोबांनी रावेरशी नमकीन चिवड्याच्या विक्री व्यवसायातून जोडलेल्या ऋणानुबंधांना उजाडा देत मोरे प्रतिष्ठानचे स्वस्तिक चित्रपटगृहाच्या कलामंदिरातच मूर्तिकलेची पूजा करीत मूर्ती व्यवसायाचे दालन खुले केले आहे. या माध्यमातून शहरात मूर्ती व्यवसायाची बाजारपेठ श्री गणेश व दुर्गा भक्तांसाठी उपलब्ध करून दिल्याचे चित्र आहे. आजोबांपासून वडिलांपर्यंत सुरू असलेल्या अभिजात मूर्तिकलेला इंटरनेट व सोशियल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन कलाकुसरीची जोड देत रावेर शहराला मूर्ती व्यवसायाची बाजारपेठ म्हणून अशी नवी ओळख रावेरच्या शिरपेचात त्यांच्या माध्यमातून रोवली गेली आहे.यंदा किमान आठ ते कमाल २१ फुट उंचीच्या मनमोहक व भाविकांच्या श्रध्देला मनमुराद साद घालणाºया विविध रूपातील नावीन्यपूर्ण कलाकुसर व रंगसंगतीचा कलाविष्कार घडलेल्या भव्य अशा मूर्तींनी यंदा सुरत, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, मलकापूर, खामगाव, जळगाव, एरंडोल, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल, चोपडा, रावेर व बºहाणपूरला भरारी घेतली आहे. पूर्वी बºहाणपूर येथील मूर्ती रावेरला आणल्या जात असत. आता मात्र मूतीर्ची भावसरीता उलट्या दिशेने वाहू लागल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर