शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनधारकांचा ‘रास्तारोको’; मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 17:34 IST

वाहतूक विस्कळीत झाल्यावर पोलिसांनी धावाधाव करुन आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत मागण्यांविषयी चर्चा केली.

कुंदन पाटील -जळगाव : किमान पेन्शन आणि महागाई भत्त्यासाठी ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्यावतीने बुधवारी आकाशवाणी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. पंधरा मिनिटांच्या या आंदोलनात जिल्ह्यातील दीड हजारावर पेन्शनर सहभागी झाले. वाहतूक विस्कळीत झाल्यावर पोलिसांनी धावाधाव करुन आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत मागण्यांविषयी चर्चा केली.

सकाळी १० वाजता या समितीची बैठक झाली. बैठकीत साडे सात हजारांचे न्यूनतम पेन्शनसह महागाई भत्ता मिळावा, तसेच दि.१ ऑक्टोबर २०१४ पूर्वीच्या आणि त्यानंतरच्या पेन्शनधारकांना सेवा, सुविधा, योजना पुरविताना भेदभाव करु नये, मोफत वैद्यकीय सेवा पुरवावी, अशा मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकाळी ११ वाजता आकाशवाणी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सर्वच आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर झोपून वाहतूक रोखून धरली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि पाच सदस्यीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची भेट घेतली. मागण्यांविषयी चर्चा केली. त्यानंतर निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष अरविंद भारंबे, यु.डी.चौधरी, बी.एन.पाटील, संजीव खडसे, कौतिक किरंगे, रमेश नेमाडे यांनी केले.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनagitationआंदोलन