शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

उमेदवारीवरून राष्टÑवादी जळगाव ग्रामीणमध्ये फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:58 IST

उमेदवारीवरुन पडले दोन गट

जळगाव : राष्टÑवादी काँग्रेसमध्ये जळगाव ग्रामीण मतदार संघातून उमेदवारीच्या मागणीवरून पक्षाचे प्रभारी तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासमोरच बुधवारी दोन गट पडले. त्यांनी वळसे पाटील यांच्याकडे आरोप-प्रत्यारोप केल्याने पक्षात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.दरम्यान पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागविलेले असताना या मतदारसंघातून माजी आमदार गुलाबराव देवकर यांनी अर्जच केलेला नसल्याने अर्ज केलेल्यांनाच उमेदवारी देण्याची मागणीही विरुद्ध गटाने केली. तर याबाबत पक्षाची विधिमंडळ समितीच निर्णय घेईल, असे सांगत वळसे -पाटील यांनी वेळ मारून नेली.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदार संघातून राष्टÑवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींसाठी बुधवार, २४ जुलै रोजी जिल्हा कार्यालयात पक्षाचे प्रभारी दिलीप वळसे पाटील तसेच निरीक्षक रंगनाथ काळे यांच्या उपस्थितीत झाल्या. यासाठी पक्षातर्फे इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जळगाव ग्रामीणमधून जिल्हा बँकेचे संचालक संजय मुरलीधर पवार, धरणगांवचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पा महाजन, युवती अध्यक्ष कल्पीता पाटील, सामाजिक न्याय अध्यक्ष अरविंद मानकरी, जितेंद्र देशमुख, माजी सामाजिक न्याय जिल्ह्याध्यक्ष कल्पना अहिरे, आयटी सेल प्रदेश उपाध्यक्ष संदीप पवार यांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले. मात्र याच मतदार संघातून यापूर्वी निवडून आलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मात्र ईच्छुक म्हणून अर्ज भरला नाही. जळगाव ग्रामीणमधील इच्छुकांच्या मुलाखती सुरू होताच देवकर समर्थकांचा गट जिल्हा कार्यालयात आला. त्यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या या ८ जणांनी बैठक घेतली. ते पक्षाशी एकनिष्ठही नसल्याचा आरोप करीत देवकर यांनाच उमेदवारी देण्याची मागणी वळसे पाटील यांच्याकडे केली. मात्र वळसे-पाटील यांनी मुलाखती संपल्यावर चर्चा करेन, असे सांगितले. तर ८ इच्छुक उमेदवारही भेटायला गेले. त्यांनी पक्षाचे आदेश असताना देवकर यांनी उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज भरला नाही? त्यामुळे अर्ज भरलेल्या ८ जणांपैकी कुणालाही उमेदवारी द्यावी. तसेच नवीन चेहरा पक्षाने द्यावा, अशी मागणी केली. मात्र वळसे पाटील यांनी त्यांनाही एकेक करून येण्यास सांगितले. त्यानुसार मुलाखती पार पडल्या.देवकरांचे आगमनगुलाबराव देवकर हे वळसे पाटील यांचे सकाळी ११.३० वाजता आगमन झाले तेव्हा राष्टÑवादी कार्यालयात उपस्थित होते. तेथे वळसे पाटील यांनी मार्गदर्शन केल्यानंतर मुलाखतींना सुरूवात होताच देवकर निघून गेले होते. मात्र सायंकाळी मुलाखती आटोपल्यावर पुन्हा ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत ते पक्ष कार्यालयात दाखल झाले. वळसे -पाटील बसलेल्या हॉलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी देवकर यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली. मात्र वळसे पाटील यांनी एकेकाशी बोलतो, असे सांगत रवाना केले. देवकर यांनी स्वत: देखील उमेदवारीबाबत सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी केली.विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारजामनेर आणि जळगाव ग्रामीण मतदार संघातच सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत. जामनेरमध्ये तब्बल १६ इच्छुकांनी तर जळगाव ग्रामीणमध्ये ८ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. ११ मतदार संघातून एकूण ५६ इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते. मुलाखती देणाऱ्यांमध्ये चोपडयातून माजी आमदार जगदीशचंद्र वळवी, डी.पी. साळुंखे, जळगाव शहरातून कल्पना पाटील, अश्विनी देशमुख, नामदेव चौधरी, डॉ. राजेंद्र भालोदे, जळगाव ग्रामीण मधून - कल्पीता पाटील, जितेंद्र देशमुख, ज्ञानेश्वर महाजन, पुष्पा महाजन, संजय पवार, अमळनेरमधून अनिल पाटील, तिलोत्तमा पाटील, एरंडोलमधून -डॉ.सतीश पाटील, अमित पाटील, चाळीसगावमधून राजीव देशमुख,पाचोºयामधून दिलीप ओंकार वाघ, जामनेरमधून संजय गरूड, मुक्ताईनगरमधून विनोद रामभाऊ तराळ यांचा समावेश आहे.वळसे यांनी उपटले कानआपले शत्रु सेना, भाजप, सर्वसामान्यांविरोधात धोरण राबविणारे सरकार आहे. त्यामुळे मुलाखती संपल्यावर कोणत्याही कार्यकर्त्या, इच्छुकाने मुंबईला तिकिटासाठी शिष्टमंडळ आणण्याची गरज नाही. जे मांडायचे ते आजच मांडा. त्यावर पक्षाबाहेर, माध्यमांसमोर मत मांडलेले सहन केले जाणार नाही, असे सांगितले. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, निरीक्षक रंगनाथ काळे, करण खलाटे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, आमदार डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, संजय गरूड, योगेश देसले, विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, महिला महानगराध्यक्षा निला चौधरी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव