शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचा सांभाळ करण्यासह लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

By सुनील पाटील | Updated: October 12, 2022 15:16 IST

गुन्हा दाखल : पतीशी घ्यायला लावला घटस्फोट

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव: पतीशी घटस्फोट घ्यायला लावून दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यासह लग्नाचे आमिष दाखवून ३२ वर्षीय महिलेवर जळगाव, पुणे व धुळ्यात बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नीलेश दत्तात्रय सोनजे (रा.शिव कॉलनी) याच्याविरुध्द रामानंद नगर पोलिसात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, पीडित महिलेचे नंदूरबार येथील तरुणाशी २००९ मध्ये विवाह झाला होता. पतीपासून तिला दोन मुले असून काही कारणास्तव दोघांमध्ये मतभेद झाल्याने पीडिता जळगाव शहरात माहेरी वास्तव्य करीत आहे. या काळात १२ मे २०१९ रोजी नीलेश सोनजे याच्याशी पीडितेची ओळख झाली. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. नीलेश याने मी तुझ्याशी लग्न करेल. तुझ्या दोन्ही मुलांचाही सांभाळ करेल. तुला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. आनंदात ठेवेल असे सांगून पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला. 

त्याच्या सांगण्यावरुन १४ सप्टेबर २०२२ रोजी पतीशी घटस्फोट घेतला. मधल्या काळात नीलेश याने लग्न करणारच आहोत म्हणून शरीरसुखाची मागणी केली. मागणी पूर्ण केली नाही तर आपल्यातील प्रेमसंबंधाची बाहेर वाच्यता करेल व तुझ्यासह मुलांचेही बरेवाईट करेल अशी धमकी दिली. त्यामुळे शिवकॉलनीत त्याच्या घरी, भजे गल्लीतील लॉज, पुणे व धुळ्यातील लॉजमध्ये नेऊन वेळावेळी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शारीरीक संबंध ठेऊन लग्नास नकार दिला व मुलांचा मारण्याची धमकी दिल्यामुळे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रोहीदास गभाले तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव