शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभाग ‘राम भरोसे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:18 IST

सुरक्षा रक्षक नाही

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभागासाठी वारंवार सुरक्षा रक्षकांची मागणी करूनही ते मिळत नसल्याने येथील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या सोबतच औषधनिर्मातादेखील मिळत नसल्याने येथे रुग्णांचे औषधीविना हाल होतात. या संदर्भात आपत्कालीन विभाग प्रमुख सुरेखा लष्करे यांनी अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांना निवेदन देऊन याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभागात अपघात व इतर वेगवगेळ््या आजाराचे रुग्ण येतात. तसेच त्यांच्यासोबत १०० ते १५० नातेवाईक व इतर मंडळीसुद्धा असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ होतो. यातून बऱ्याच वेळा वाद होतात व कधी कधी तर वैद्यकीय अधिकाºयांना मारहाण सुध्दा केली जाते. असे असतानाही येथे सुरक्षा रक्षक उपलब्ध करून दिले जात नाही.रुग्णालयात २१ सुरक्षा रक्षक आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा विभाग असलेल्या आपत्कालीन विभागातच सुरक्षा रक्षक नाही. ज्या ठिकाणी आवश्यकता नाही तेथे सुरक्षा रक्षक तैनात केले जातात, असा आरोप केला जात आहे.औषधनिर्मात्याअभावी हालआपत्कालीन विभागात रात्र पाळीला औषधनिर्माता नसल्याने औषध देण्यास कोणीच नसते. त्यामुळे औषध कोणी द्यायचे असा प्रश्न निर्माण होतो. अनेक अडचणी येत असल्या तरीदेखील औषधनिर्माता नसल्याचे कारण सांगत चाल-ढकल केली जात असल्याचेही तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.शुक्रवारीदेखील ओढावला प्रसंगशुक्रवारी संध्याकाळीदेखील चाकू हल्ल्यातील रुग्णांना येथे आणल्यानंतर आपत्कालीन विभागात गर्दी झाली होती. त्यामुळे उपचारात अडचणी येत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगण्यात येत होते. मात्र कोणीही बाहेर निघत नव्हते. अखरे सुरक्षा रक्षकाला बोलावून नातेवाईक व इतरांना बाहेर काढण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाºयांनी दिल्या. मात्र सुरक्षा रक्षकच नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.आपत्कालीन विभागात सुरक्षा रक्षक नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच औषधनिर्माता नसल्यानेही अनेक अडचणी येतात. या बाबत अधिष्ठातांकडे वारंवार मागणी करूनही लक्ष दिले जात नाही. - सुरेखा लष्करे, विभाग प्रमुख आपत्कालीन विभाग.

टॅग्स :Jalgaonजळगाव