शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रींच्या लेकींच्या रॅलीने धरणगाव दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 17:32 IST

सावित्रींच्या लेकींनी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त रॅली व वैचारिक कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्देरॅलीतून दिली सावित्रींनामाईंना मानवंदनाशहरातील विविध शाळांचा सहभाग

धरणगाव, जि.जळगाव : येथील सावित्रींच्या लेकींनी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त रॅली व वैचारिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी सावित्रीमाईंच्या कार्याची महती वर्णन केली.रॅलीची सुरुवात म.जोतिराव फुले यांच्या धरणी चौकातील स्मारकापासून पुष्पार्पण करून झाली. यावेळी माजी नगराध्यक्षा उषा वाघ, माजी प्रभारी नगराध्यक्षा अंजली विसावे, प्रा.कविता महाजन यांच्यासह प्राध्यापिका व शिक्षिका तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. रॅलीच्या सुरुवातीला म.फुले व सावित्रीमाई फुले यांच्या वेशभूषा केलेल्या वैशाली देशमुख व दीपाली नेतकर या मुली होत्या. त्यानंतर महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थिनी सावित्रीमाईंच्या वेशभूषेत होत्या. त्यांच्या पाठोपाठ विविध शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. धरणी चौकातून सुरू झालेली रॅली शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली. रॅलीत महात्मा फुले हायस्कूल, पी.आर.हायस्कूल, अँग्लो ऊर्दू हायस्कूल, इंदिरा कन्या विद्यालय, बालकवी ठोंबरे विद्यालय, जि.प. उर्दू शाळा नं. १, नं. २ व नं. ३ या सर्व शाळांनी सहभाग नोंदवला.समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.जे.महाजन यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.पाळधी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाविस्कर होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून मनीषा शिरसाठ होत्या. म.फुले हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. निकिता महाजन या विद्यार्थिनीने सावित्रीमाईंचे गीत सादर केले. रुपाली पाटील हिने सावित्रीमाई डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याचा विषय आहे, असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून राजेंद्र वाघ, पी.डी.पाटील, लक्ष्मण पाटील, हेमंत माळी यांच्यातर्फे 'सावित्रीबाईंचा जन्मोत्सव' या पुस्तिकेच्या १०० प्रती विद्यार्थिनी व शिक्षिका यांना भेट स्वरूप देण्यात आल्या.अध्यक्षा सुलोचना बाविस्कर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन या देखण्या कार्यक्रमाच्या नियोजनाची स्तुती केली. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिºहाडे , माळी समाज अध्यक्ष विठोबा महाजन, उपाध्यक्ष योगराज माळी, सचिव दशरथ माळी, कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी, गटनेते कैलास माळी, विलास माळी, माजी उपनगराध्यक्ष मधुकरजी रोकडे, मुख्याध्यापक निजामोद्दीन शेख, मुख्याध्यापक शेख मुजफ्फर, मुहम्मद आरीफ, माजी मुख्याध्यापक एस.डब्ल्यू.पाटील यांच्यासह सर्व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव पाटील, विनायक महाजन ,शहराध्यक्ष राजू महाजन, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जितू महाराज, योगेश येवले, जगदीश जगताप, पंकज पाटील, शुभम बागुल, अतुल तायडे, संजय महाजन, प्रदीप माळी, कृष्णा माळी, समाधान माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे यांनी, तर आभार प्रदर्शन एम.के. कापडणे यांनी केले.

टॅग्स :Educationशिक्षणDharangaonधरणगाव