बालनिकेतन विद्यामंदिर
कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व नवीन माध्यमिक विद्यालयात मुलींनी औक्षण करून मुलांना राखी बांधली. तसेच यावेळी मुलांनी चॉकलेट स्वरूपात भेटवस्तूही दिल्या. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक डॉ.रवींद्र माळी व नीलेश नाईक उपस्थित होते. यानंतर ऑनलाइन पद्धतीने राखी तयार करणे, रक्षाबंधनाचे चित्र काढणे व निबंध स्पर्धाही घेण्यात आल्या. सूत्रसंचालन राहुल धनगर यांनी केले. यशस्वीतेसाठी नरेंद्र वारके, उज्ज्वला जाधव, वंदना नेहते, रशिदा तडवी, राजेंद्र पवार, श्रीकांत पाटील, संगीता निकम, सुवर्णा सोनार, ज्योती सपकाळे, स्वाती याज्ञिक, भूषण बऱ्हाटे यांनी परिश्रम घेतले.
विद्या इंग्लिश स्कूल
विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्येही ऑनलाइन पद्धतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींनी घरीच राहून आपल्या भावांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी रक्षाबंधनानिमित्त राखी बनविणे, ग्रीटिंग कार्ड तयार करणे, थाली डेकोरेशन अशा प्रकारच्या स्पर्धाही यावेळी घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक हॅरी जॉन व प्रशासिका कामिनी भट यांनी केले होते.
मानव सेवा विद्यालय
मानव सेवा विद्यालयात विद्यार्थांसाठी ऑनलाइनद्वारे इको फ्रेंडली राखी बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोनाविषयी संदेश देणारे, टाकाऊपासून टिकाऊ राखी कशी बनवावी आदी माहिती विद्यार्थांना शिक्षक सुनील दाभाडे यांनी दिली. यानंतर रत्ना चोपडे यांनी विद्यार्थांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. यावेळी मुख्याध्यापिका माया अंबटकर, प्रतिभा सूर्यवंशी, शिशूच्या मुक्ता पाटील उपस्थित होत्या.