शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

रक्षा खडसे, गुलाबराव देवकर कोट्यधीश उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:05 IST

जळगाव,रावेर लोकसभा मतदार संघ :दोघेही शिक्षित उमेदवार

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करणाऱ्या भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे व जळगाव लोकसभा मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसकडून उमेदवारी दाखल करणारे उमेदवार गुलाबराव देवकर हे दोघेही कोट्यधीश उमेदवार असल्याचे त्यांनी उमेदवारीबरोबर दाखल केलेल्या सांपत्तिक स्थितीच्या विवरणावरून लक्षात येते.जळगाव लोकसभा मतदार संघातून गुरूवारी भाजपातर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून या मतदार संघाच्या विद्यमान आमदार रक्षा खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर जळगाव लोकसभा मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसने उमेदवारी दिलेल्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.सांपत्तीक स्थितीत वाढदाखल केलेल्या उमेदवारी अर्जाबरोबर दोन्ही उमेदवारांनी आपल्या सांपत्तीक स्थितीबाबतचा तपशिल १०० रूपयांच्या स्टॅँप पेपरवर प्रतिज्ञापत्राद्वारे दिला आहे. रक्षा खडसे यांची जंगम मालमत्ता ४५ कोटी ७० लाख ३५ हजार ३३३ एवढी जंगल मालमत्ता आहे. तर ३ कोटी ९ लाख २ हजार ९५ एवढी स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. विविध प्रकारची आर्थिक गुंतवणूक, रोकड अशा सांपत्तिक स्थितीत चढ उतार असल्याचे लक्षात येते. पाच वर्षाच्या सांपत्तीक स्थितीच्या विवरणात वर्षाचे उत्पन्न सन २०१३- १४- २७,६०,०७३, २०१४-१५ मध्ये ८८,२६,००३, २०१५-१६ मध्ये १,१६,०२,४६६, २०१६-१७ मध्ये १,०९,४५,१२२, २०१७-१८ मध्ये ८७,५५,३२३ रूपये अशी होती.देवकरही कोट्यधीशजळगाव लोकसभा मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसकडून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या गुलाबराव देवकर यांचे शिक्षण पी.डी. कॉमर्स असे आहे. दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत: व पत्नीच्या नावाने असलेल्या संपत्तीचे विवरण त्यांनी दिले आहे.देवकर यांच्या व पत्नीच्या नावावे जंगम मालमत्ता १ कोटी ३३ लाख ५२ हजार ५१७ एवढी आहे. तर स्थावर मालमत्ता ३ कोटी ७३ लाख आहे. वैयक्तीक उत्पन्न व सांपत्तीक स्थितीबाबतच्या वितरणात वर्षनिहाय वाढ झाल्याचेच लक्षात येते. यात २०१३ -१४ मध्ये २,५१,७७४, २०१४-१५ मध्ये ३,०१,८९६, २०१५-१६ मध्ये ६,८६,६५०, २०१६-१७ मध्ये १८,२४,४२० तर २०१७-१८ मध्ये ७,५१,११६ रूपये असे ’उपन्न होते.देवकरांवर कर्जाची जबाबदारीरावेर लोकसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवित असलेल्या रक्षा खडसे या उच्च शिक्षीत उमेदवार आहेत. त्यांच्या नावावर कोणतेही कर्ज नाही. तसेच गुन्हाही दाखल नाही. जळगाव लोकसभा मतदार संघातील राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या व पत्नीच्या नावे ८५,५२,६६७ रूपये एवढे कर्ज आहे. देवकरांविरोधात मात्र दोन गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण