मुक्ताईनगर, जि. जळगाव : बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन हा नारळी पौर्णिमा या शुभ मुहूर्तावर साजरा करीत असलेला एक महत्वपूर्ण सण आहे. या पवित्र सणाने बहीण भावाचे नाते जपत संत मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगरकडून म्हणजेच आदिशक्ती श्री संत मुक्ताईकडून संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपान काका या भावंडांना रक्षाबंधनानिमित राख्या पाठविण्यात आल्या. त्या त्या संस्थाननेदेखील बहिणीची मायेने आलेली राखी तिघे संतांना पूजा अभिषेक पार पडल्यावर बांधण्यात आल्या तर तिघे भावंडांकडून संतांची संस्थाने यांनीदेखील परंपरेने साडी, चोळी पाठविली. त्यापैकी ज्ञानदाकडील साडी चोळी बुधवारी विधीवत पूजा करुन आदीशक्ती मुक्ताबाईस नेसविण्यात आली.यावेळी हभप रवींद्र महाराज हरणे, उध्दव जुनारे, विनायकराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील व भाविकभक्त उपस्थित होते.
रक्षाबंधनानिमित्त मुक्ताईने पाठविली संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व सोपन काकास राखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:10 IST