राजस्थानी समाजाने फुलांच्या पाकळ्या उधळून केले श्री विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:51 AM2018-09-23T00:51:54+5:302018-09-23T01:00:56+5:30

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भुसावळातील राजस्थानी समाजाने फुलांच्या पाकळ्या उधळून स्तुत्य असा उपक्रम पर्यावरण संतुलासाठी राबविला

 The Rajasthani community has blossomed flowering petals, Shri Visharjan | राजस्थानी समाजाने फुलांच्या पाकळ्या उधळून केले श्री विसर्जन

राजस्थानी समाजाने फुलांच्या पाकळ्या उधळून केले श्री विसर्जन

Next
ठळक मुद्देमहिलांनी भजन, गाणी गाऊन दिला गणरायाला निरोपतापी नदीत उत्साहात विसर्जन

भुसावळ : शहरातील राजस्थानी समाजातर्फे सराफ बाजारातील पुरातन श्रीलक्ष्मीनारायण मंदिर, छगनलाल बगीचा मंदिर व जुन्या बालाजी मंदिरातील गणपती मूर्तीचे विसर्जन फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत करण्यात आले. यावेळी महिलांनी भजन, गाणी गाऊन पालखी काढून मूर्तीचे तापी नदीत विसर्जन केले.
या प्रसंगी मंदिराचे प्रमुख गोपाल शर्मा महाराज (चौबे), पद्माकर जोशी महाराज, बालाजी मंदिराचे बंडू महाराज, धर्मेंद्र शर्मा महाराज, पंडित श्याम चौबे, विनोद शर्मा, जे.बी.कोटेचा, राधेश्याम लाहोटी, मोहनलाल शर्मा, नमा शर्मा, सत्यनारायण शर्मा, नंदकिशोर पुरोहित, संतोष टाक, गोपाल अग्रवाल, चंद्रकांत मंत्री, गोपाल चांडक, नीलेश शर्मा, कैलास डिडवाणी, अनुप अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, सुनील अग्रवाल, संदीप अग्रवाल, संजय अग्रवाल, सुनील ठाकूर, सुनील झंवर, मुन्ना शर्मा, मुरलीधर अग्रवाल, प्रमोद राठी, राजेश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

 

Web Title:  The Rajasthani community has blossomed flowering petals, Shri Visharjan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.