शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पावसाने पाच तालुक्यात ओलांडली ५० टक्क्यांची सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:53 IST

पावसाची जोरदार हजेरी : मात्र अद्यापही ७ मध्यम प्रकल्पात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा

जळगाव : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाने तब्बल २३ दिवस उशीराने हजेरी लावूनही पावसाने सलग व जोरदार हजेरी लावत मागील वर्षीची आजपर्यंतची सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असले तरीही अद्यापही जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.५ तालुक्यांनी ओलांडली सरासरीची पन्नाशीमागील वर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यात सरासरी ३८.९ मिमी पाऊस झाला होता. मात्र यंदा पावसाचे आगमन उशीरा होऊनही जोरदार हजेरी लावल्याने पावसाने ही सरासरी ओलांडली असून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ४७.४ टक्के पाऊस झाला आहे. जामनेर तालुक्यात सर्वाधिक ६५.४ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत केवळ ३० टक्केच पाऊस या तालुक्यात झाला होता. तर एरंडोल ५३.४ टक्के, भुसावळ ५१.२, मुक्ताईनगर ५७.०० टक्के तर पाचोरा तालुक्यात ५०.२ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरीत सर्व तालुक्यात ३९ टक्क्यांच्यावर पाऊस झाला आहे. जळगाव तालुक्यात ४२.९ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी केवळ ३६.६ टक्के पाऊस झाला होता.एकाच दिवसांत २५ मिमी पाऊसजळगाव तालुक्यात शनिवारी दिवसभर व रात्रीतून २४.९ मिमी पाऊस झाला. तर धरणगावला ३१.१ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १० मिमी पाऊस एका दिवसांत झाला. मात्र चाळीसगाव, बोदवड तालुका मात्र काल कोरडा होता.मध्यम प्रकल्पांची अवस्था बिकटमात्र दुसरीकडे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची अवस्था मात्र बिकट आहे. १३ मध्यम प्रकल्पांपैकी ७ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यात बहुळा मध्ये ०.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर अग्नावती, हिवरा, अंजनी, भोकरबारी, बोरी, मन्याड या धरणांमध्ये आजही शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. उर्वरीत प्रकल्पांमध्ये सरासरी १८.७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर ९६ लघु प्रकल्पांमध्ये ७.९७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.मोठ्या प्रकल्पांमध्ये वाढतोय पाणीसाठाहतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांवर जिल्ह्यातील अनेक शहरांसह गावांचाही पाणीपुरवठा अवलंबून आहे. या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा मे अखेरीस शून्य टक्क्यांवर पोहोचला होता. तर वाघूरमध्ये जेमतेम ९ टक्के पाणीसाठा उरला होता. मात्र या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे या मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे हतनूरमध्यये १९.१४ टक्के, गिरणा १२.८२ टक्के तर वाघूरमध्ये २९.८६ टक्के असा एकूण सरासरी १८.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणावर दूर झाले आहे.पावसामुळे पिकांना फायदागेल्या आठवडाभरापासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना फायदाच होणार आहे. मात्र शेतात पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी मात्र शेतकऱ्यांनी घ्यावी. अन्यथा पिक पिवळे पडण्याची भिती आहे. त्यामुळे पाणी तुंबणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कपाशी लागवडीला जेमतेम महिना-दीड महिना झाला आहे. तसेच उडीद-मूगही वाढीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्यावरील कीड पावसामुळे वाहून जाणार असल्याचे सांगितले.गिरणाच्या साठ्यात वाढीने दिलासादापोरा, ता. जळगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे व एरंडोल उपविभागाचे उपभियंता एम.आर. अत्तरदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, गिरणा धरणाचे उगम क्षेत्रात कसमा पट्ट्यातील कळवण, सटाणा, मालेगाव या तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने गिरणा धरणावरील चणकापूर ६९ टक्के, अर्जुनसागर (पूनंद) ६९ टक्के, हरणबारी १०० टक्के, केळझर ६० टक्के, माणिकपुंज या सारख्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. २५००० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सोमवारी सकाळी सहावाजेपर्यंत धरणाचा पाणीसाठा २० टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव