शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजा खान्देशात परतला, जळगावात सर्वाधिक बरसला! जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ७२ टक्के पाऊस

By ajay.patil | Updated: September 10, 2023 18:51 IST

चार दिवसात जळगाव जिल्ह्यात १०९ मिमी पावसाची नोंद

जळगाव - ऑगस्ट महिन्यात पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जोरदार पुनरागमन केले असून, जळगाव जिल्ह्यात केवळ चार दिवसातच १०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. खान्देशात एकूण सरासरीच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ७२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिला, तर जळगाव जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस होण्याचीही शक्यता आहे.

खान्देशातील धुळे, जळगाव व नंदुरबार या तीन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. मात्र, आगामी काही दिवस खान्देशात ढगाळ वातावरण कायम राहू शकते. मात्र, पावसाचा वेग कमीच राहण्याची शक्यता आहे. १७ सप्टेंबरनंतर काही प्रमाणात पुन्हा पावसाचे आगमन होऊ शकते. गेल्या चार ते पाच दिवसात झालेल्या पावसामुळे तीन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

खान्देशातील तीन जिल्ह्यांमध्ये झालेला पाऊसजिल्हा - झालेला पाऊस - एकूण सरासरीजळगाव - ४५९ मिमी - ७२.७ टक्केधुळे - ३३३ मिमी - ६२.३ टक्केनंदुरबार - ५२१ मिमी - ६०.६ टक्के

जून, ऑगस्ट या दोन महिन्यात झालेला पाऊस, केवळ चार दिवसात  जळगाव जिल्ह्यात जून महिन्यात ४५ मिमी तर ऑगस्ट महिन्यात ४८ मिमी पाऊस झाला होता. या दोन्ही महिन्यात मिळून ९३ मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत सप्टेंबर ६ ते ९ सप्टेंबर दरम्यानच्या चार दिवसातच जळगाव जिल्ह्यात १०९ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच जून व ऑगस्ट या दोन महिन्यांचा पाऊस केवळ चार दिवसातच झाला आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला होता. यंदा देखील हेच चित्र पहायला मिळत असून, सप्टेंबर महिन्यातील एकूण पावसाची १२३ मिमी इतकी सरासरी आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १०९ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अजून काही दिवस या सरासरीत वाढ होऊ शकते.

टॅग्स :Rainपाऊस