शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने जळगावात दाणादाण, अनेक ठिकाणी उन्मळले वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 12:55 IST

बजरंग बोगदा पुन्हा तुंबला

ठळक मुद्देएमआयडीसीत विजेचा खांब कोसळलान्यायालय परिसरात वृक्ष कोसळले, दोन दुचाकींचे नुकसान

जळगाव : शहरात दुपारी झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र दाणादाण केली. न्यायालय आवारात वृक्ष उन्मळून पोलिसाच्या दुचाकीचे नुकसान झाले. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. याचबरोबर बजरंग बोगद्यात पुन्हा पाणी साचून या ठिकाणची वाहतूक बंद पडली. दरम्यान अचानक आलेल्या पावसाने काही गणेश मंडळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.पंधरा दिवसांपूर्वीच नवीन बजरंग बोगद्यातील पाण्याचा निचरा करुन, हा बोगदा वाहतुकीसाठी खुला झाला होता. पावसाचे पाणी साचू नये यासाठी गटारीचे कामही केले होते. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. बुधवारी झालेल्या पावसाने पहिल्यासारखी स्थिती निर्माण निर्माण झाली. अर्धा तास चाललेल्या पावसात बोगद्यात गुडघ्यापर्यंत पाणी तुंबल्याने, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. नवीन बोगद्याचे पाणी थेट रस्त्यापर्यंत आले होते. तर जुन्या बोगद्याच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावरचे पाणी बोगद्याकडेच येत असल्याने या ठिकाणींही पाणी साचून वाहतूकदेखील ठप्प झाली होती. तासाभराने नव्या बोगद्यातील पाण्याचा निचरा झाल्यावर वाहतूक सुरळीत झाली.एमआयडीसीत विजेचा खांब कोसळलापाऊस सुरु झाल्यानंतर वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे एमआयडीसीतील के सेक्टरमध्ये मुख्य लाईनवरील विद्युत खांब कोसळला. यामध्ये या भागात व इतर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. घटनेची माहिती मिळताच, महावितरणच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन, युद्ध पातळीवर काम सुरु केले. सायंकाळी या भागातला वीज पुरवठा सुरळीत झाला. तसेच सिद्धार्थ कॉलनी येथेही वीज तारांवर झाड कोसळल्याची घटना घडली. शहर कार्यकारी अभियंता संजय तडवी व त्यांच्या कर्मचाºयांनी युद्ध पातळीवर काम करुन या ठिकाणचाही वीज सायंकाळपर्यंत सुरु केला. तर मयूर कॉलनी, गणपती नगर, निसर्ग कॉलनी, खंडेराव नगर या भागात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता?अनेक ठिकाणी झाडे कोसळलीवाºयामुळे शहरातील विविध भागात डेरेदार वृक्षांसह झाडांच्या फांद्यादेखील तुटून पडल्या. यामध्ये भास्कर मार्केट जवळ २ झाडे, नवजीवन मंगल कार्यालय १, आर.आर.शाळेजवळ १, श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान १, एमजे कॉलेजजवळील आस्वादचौक १ व बेंडाळे कॉलेजसमोररस्त्यावरील दुभाजकामध्ये लावलेले झाड कोसळले. यामुळे काही ठिकाणी वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. तररस्त्यावरील सखल भागात पाण्याच्या डाबा तुंबल्याने वाहनधारकांचे हाल झाले.न्यायालय परिसरात वृक्ष कोसळले, दोन दुचाकींचे नुकसानअचानक झालेल्या वादळ व पावसामुळे बुधवारी दुपारी चार वाजता न्यायालय आवारात पोलीस चौकीला लागून असलेले वृक्ष कोसळले. सुदैवाने त्यावेळी या वृक्षाजवळ कोणीत नव्हते, मात्र यात दोन दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या एका पोलिसाच्या दुचाकीचे (क्र.एम.एच. १९ बी.वाय ५८६२) प्रचंड नुकसान झाले. उजव्या बाजुचे हॅँडल तुटले तर दुसºया दुचाकीचे (क्र.एम.एच.१९ बी.बी. ७२७६) नुकसान झाले.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव