शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने बांगला देशला ५५ मालगाड्यांद्वारे १.२६२ लाख टन कांदा निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 14:54 IST

वासेफ पटेल भुसावळ , जि.जळगाव : मध्य रेल्वेने मे ते १० जुलैपर्यंत ५५ माल गाड्यांमधून वाहतूक करून एक लाख ...

ठळक मुद्देबळीराजा खुशकोरोना काळात रेल्वेने केल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेने मे ते १० जुलैपर्यंत ५५ माल गाड्यांमधून वाहतूक करून एक लाख टनांहून अधिक कांद्याची निर्यात केली आहे. रेल्वेसाठी ही एक मोठी कामगिरी आहे. यामुळे कोरोना आजारात शेतकऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण झाल्या आहेत. तसेच शेजारी देश असलेल्या बांगला देशच्या आवश्यक गरजा पूर्ण केल्या आहेत.भारताच्या कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या महाराष्ट्रातील नाशिक, मनमाड, कोपरगाव या भागातील शेतकरी कांद्याच्या या निर्यातीमुळे समाधानी आहे. शिवाय, शेतकरी, निर्यातदार, रेल्वे आणि बांगलादेशसाठीसुद्धा ही अनुकूल स्थिती आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी जसे कांदा इत्यादी करण्यात आलेल्या विनंतीनुसार रेल्वेने बांगला देशात कांद्याची निर्यात सुरू केली. १.२६२ लाख टन कांद्याने भरलेल्या ५५ मालगाड्या मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक, खेरवाडी, निफाड, लासलगाव आणि मनमाड स्थानकांमधून आणि तसेच सोलापूर विभागाच्या कोपरगाव, येवले स्थानकांमधून बांगला देशातील दर्शना, रोहनपूर, बिरोले आणि बेनापोल येथे पाठविण्यात आल्या.६ मे रोजी लासलगाव ते दर्शना, बांगलादेश येथे बांगलादेशात पाठविलेल्या पहिल्या रॅकपासून या निर्यातीची सुरुवात झाली. मे महिन्यातच कांद्याच्या २७ मालगाड्यांची निर्यात करण्यात आली. जूनमध्ये २३ मालगाड्यांची वाहतूक आणि जुलैमध्ये आतापर्यंत ५ मालगाड्या (रॅक्स) बांगलादेशात रवाना करण्यात आल्या आहेत.पाठवलेल्या ५५ पैकी १३ मालगाड्या मनमाडहून, निफाडहून ११, येवले येथून १०, खेरवाडी येथून ८, नाशिकहून ७ लासलगाव येथून ५ आणि कोपरगाव येथून एक रेल्वे अशा मालगाड्या पाठविण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेने माल वाहतूक करणाºयांशी नियमितपणे घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकांच्या परिणामस्वरूप बांगलादेशात कांद्यांची निर्यात झाली आहे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून माल वाहतुकदारांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. लोडिंग दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्सिंगचे आणि निर्जंतुकीकरणाच्या उपाय योजना केल्या जात आहेत.कांद्याची लागवड करणारे चांदवड, नाशिक येथील प्रकाश बिकाजी सोनवणे यांनी सांगितले की, बांगलादेशात कांद्याची निर्यात व मालवाहतूक केल्याने चांगले पैसे मिळू शकले आणि रेल्वेने लोडिंगसाठी वॅगन उपलब्ध करून दिल्याबद्दल रेल्वेचे आभार मानले. धुगाव, चांदवड येथील संतोष हरिभाऊ जाधव हे आणखी एक शेतकरी म्हणाले, कोरोना असूनही रेल्वेने केलेल्या वॅगनच्या तरतुदीमुळे या भागातील सर्व शेतक-यांना कांद्याच्या निर्यातीतून काही पैसे मिळविण्यास मदत झाली आणि रेल्वेने वेळेवर केलेल्या या मदतीसाठी आभारही मानले.रेल्वे माल वाहतुकीला चालना देण्यासाठी मध्य रेल्वेने मोठ्या मालवाहतूक करणा-यां ग्राहका समवेत आभासी (व्हर्च्युअल) बैठक आयोजित केली आहे. मध्य रेल्वेवरील सर्व विभागीय स्तरावरसुद्धा अशाच बैठका घेण्यात येत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ