जळगाव- धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्यामुळे वैभव आत्माराम लभाणे (वय-३३, रा़ बल्लारपूर जि़ चंद्रपूर) या रेल्वे कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी भुसावळ-वरणगाव दरम्यान उघडकीस आली़भुसावळ वरणगाव दरम्यान फेकरी शिवारात लोहमार्गावर तरूणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, हवालदार प्रेमचंद सपकाळे, हवालदार अजय माळी, पोलीस कॉन्सटेबल शिवाजी खंडारे यांना मिळाली होती़ त्यांनी घटनास्थळी धाव घेवून रूग्णवाहिकेतून वैभव यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. यावेळी मयताची अंगझडती घेतली असता त्यामध्ये आधारकार्ड आढळून आल्याने तरूणाची ओळख पटली़ त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली़बुधवारी दुपारी नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वैभव हे अविवाहित असून पश्चात दोन भाऊ, आई वडील असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वेच्या धक्का लागनू रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 23:07 IST