शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:58 IST

भुसावळ येथील मोहीत नगर भागातील रहिवासी व रेल्वेच्या साहित्य पुरवठा विभागात कार्यरत लिपीक गौतम आनंदा शिंदे (वय ३७) यांनी आत्महत्या केली.

ठळक मुद्देराहत्या घरात पहिल्या मजल्यावर पंख्याला दोरीने घेतला गळफासआत्महत्येचे कारण अज्ञात२००४ पासून कार्यरत होते रेल्वे सुरक्षा बलातील खानावळ विभागातसकाळी आई उठवण्यासाठी गेली असता उघडकीस आली घटनाघटनास्थळी आढळली बारीक दोरी व लोखंडी शिडी

भुसावळ, जि.जळगाव : येथील मोहीत नगर भागातील रहिवासी व रेल्वेच्या साहित्य पुरवठा विभागात कार्यरत लिपीक गौतम आनंदा शिंदे (वय ३७) यांनी आत्महत्या केली. ८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीतील पंख्याला दोरीने गळफास घेतल्याची घटना सकाळी उघडकीस आली.सन २००४ पासून रेल्वे सुरक्षा बलामध्ये खानावळ विभागात कार्यरत व काही कारणात्सव गेल्या वर्षापासून रेल्वे विभागात स्टोअरमध्ये लिपीक पदावर कार्यरत असलेले गौतम आनंदा शिंदे हे त्यांच्या राहत्या घरी ७ मे रोजी पहिल्या मजल्यावर झोपले होते. बुधवारी सकाळी गौतम शिंदे यांची आई त्यांना उठविण्याकरिता वरच्या मजल्यावर गेल्या असता गौतमने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. गौतमचा मृतदेह बघताच आईसह परिवाराने हंबरडा फोडला. यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले.दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. घटनास्थळी बारीक दोरी व लोखंडी शिडी आढळून आली. पोलीस पंचनामा करुन जळगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले.गौतम यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, दोन भाऊ , तीन बहिणी असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे .दरम्यान, ६ रोजी रेल्वे पोलीस कर्मचारी मिलिंद देशमुख यांचा सहकुटुंब तामिळनाडू येथे अपघात झाला. यात देशमुखांसह कुटुंबीयांचे सहा सदस्य ठार झाले होते. लागोपाठच्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दुर्दैवी घटनांमुळे रेल्वे कर्मचाºयांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूBhusawalभुसावळ