शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे बोर्डाकडून सुरक्षा अहवालाचे उल्लंघन : सुनील फिरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 17:59 IST

रेल्वे अभियंत्यांसाठी स्वतंत्र व्यासपीठाची गरज

ठळक मुद्देरेल्वे बोर्डाच्या कृतीमुळे अभियंत्यांमध्ये निराशेचे वातावरणरेल्वे बोर्डाने २७ डिसेंबर २०१७ रोजी जारी केले पत्ररेल्वे बोेर्डाने रेल्वेची सुरक्षा दावणीला बांधल्याचा आरोप

आॅनलाईन लोकमतभुसावळ , दि.२९ : भारतीय रेल्वे मंडळाने ३१ जानेवारी २०१७ रोजी केलेल्या सुरक्षा अहवालाचे बोर्डाकडूनच उल्लंघन झाल्याची बाब रेल्वेच्या सुरक्षेसाठी धोकेदायक असल्याचे मध्य रेल्वे इंजिनिअर असोसिएशनने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती असोसिएशनचे विभागीय सचिव सुनील फिरके यांनी दिली.फिरके यांच्या माहितीनुसार रेल्वेच्या सुरक्षेबाबत २०१६ च्या टास्क १फोर्स सुरक्षा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी ३१ जानेवारी २०१७ रोजी पत्र (क्रमांक २०१७/ई (एलआर)३/आरईएफ/ आरबी/१ नुसार) जारी करण्यात आले होते. या पत्रानुसार सहाव्या वेतन आयोगात ४ हजार २०० वेतनश्रेणीत सेवा करणारे पर्यवेक्षक ३१ मार्च २०१७ नंतर ट्रेड युनियन पदाधिकारी राहणार नाहीत. टास्क फोर्स सुरक्षा अहवालानुसार पर्यवेक्षकांचे संपूर्ण लक्ष (कनिष्ठ व वरिष्ठ अधीक्षक अभियंता) रेल्वेच्या सुरक्षाकडे राहते आणि त्यांना त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ द्यावे. पर्यवेक्षकांना ट्रेड युुुनियनमधील सहभागामुळे ते त्यांच्या अधिकृत कर्तव्यावर पूर्ण लक्ष देण्यास असमर्थ ठरतात म्हणून टास्क फोर्स समितीने शिफारस केली होती.दरम्यान, आता रेल्वे बोर्डाने २७ डिसेंबर २०१७ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार ३१ जानेवारी २०१७ आदेश रद्द केला आहे. रेल्वे बोर्डाच्या या कृतीमुळे अभियंत्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, फिरके यांनी कळविले आहे की, मध्य रेल्वे अभियंता असोसिएशनचे सरचिटणीस व अभियंता जे.के.सिंह यांनी अत्यंत निराश होऊन रेल्वेने जारी केलेल्या २७ डिसेंबर २०१७ च्या आदेशाचा निषेध केला आहे. रेल्वे बोेर्डाने रेल्वेची सुरक्षा दावणीला बांधली आहे. या निर्णयामुुळे अभियंत्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. रेल्वेत तांत्रिक विकासाच्या प्रवाहात रेल्वे अभियंत्यांना त्यांचे नैतिक पद आणि योगदानाबद्दल प्रोत्साहीत करण्यासाठी अभियंत्यांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे गरजेचे होते.काय होते रेल्वेचे आदेशसहाव्या वेतन आयोगाच्या ४ हजार २०० रुपये वेतनश्रेणीतील पर्यवेक्षक आणि त्याच्या पुढील श्रेणीतील कर्मचारी रेल्वेतील कोणत्याही कामगार संघटनेत पदाधिकारी म्हणून राहू शकणार नाही. पदावर असल्याने त्याला रेल्वेच्या कामाकडे लक्ष देता येणार नाही. यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. रेल्वेचा हा आदेश येताचा रेल्वे कामगार संघटनांनी तीव्र स्वरुपाचे आंदोलन करुन हा आदेश मागे घेण्याची मागणी केली होती. अखेर वर्षभरातच आदेश मागे घेण्यात आला.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळ