शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाला त्रास झाल्याने रेल्वे प्रशासनाला ३५ हजार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 15:29 IST

रेल्वे प्रवासामध्ये प्रवाशाला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी जळगाव जिल्हा ग्राहक मंचाने रेल्वे प्रशासनाला ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देजळगावातील राजेंद्र साबळे यांनी दाखल केली होती तक्रारदंडाची रक्कम महिनाभरात देण्याचे ग्राहक मंचचे आदेशतक्रारदार पुणे येथे वैद्यकीय उपचारासाठी गेले होते

जळगाव : रेल्वे प्रवासामध्ये प्रवाशाला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी जळगाव जिल्हा ग्राहक मंचाने रेल्वे प्रशासनाला ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. राजेंद्र साबळे असे तक्रारदार प्रवाशांचे नाव असून, साबळे यांना झालेल्या नुकसान भरपाईपोटी दंडाची रक्कम त्यांना एका महिन्याच्या आत देण्याचे आदेशही दिले आहेत, अशी माहिती तक्रारदार साबळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.साबळे म्हणाले, २२ एप्रिल २०१५ रोजी पुणे येथे वैद्यकीय उपचारासाठी ते पत्नीसह गेले होते. परतीच्या प्रवासासाठी महाराष्ट्र एक्सप्रेसचे वातानुकूलित डब्याचे जेजुरी ते जळगाव असे दोन तिकीट घेतले. मात्र, त्यावेळी दोघांचे तिकीट प्रतीक्षा यादीत होते. २७ एप्रिल रोजी दोन तिकीटांपैकी एक तिकीट बी-२ या डब्यामध्ये ६४ नंबरच्या जागेवर निश्चित झाले असल्याचे समजले तर दुसरे तिकीट बी-१ या डब्यामध्ये ६३ नंबरच्या जागेवर असल्याचे आढळून आले. त्यानुसार साबळे हे पत्नीसह (गाडी क्र ११०३९) या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये रात्री ११ च्या सुमारास बी-२ या डब्यात चढले. मात्र, या डब्यातील आरक्षित असलेली ६४ नंबरची जागा आढळून आली नाही. यावर तिकीट निरीक्षकाकडे तक्रार केल्यावर त्यांनी, साबळेंकडे दुर्लक्ष केले. परंतु, साबळे यांनी जागेसंदर्भात पुन्हा तक्रार केल्याने, तिकीट निरीक्षकाने रात्री २.३० वाजता साबळे व त्यांच्या पत्नीलाही दुसऱ्या जागेवर बसण्याची व्यवस्था करून दिली. तिकीट आरक्षित असताना, प्रवासात झालेल्या त्रासाबद्दल साबळे यांनी भुसावळ येथे डीआरएम कार्यालयाकडे तक्रार केली. डीआरएम कार्यालयाने दोन महिन्यांनी साबळे यांना ही तक्रार, पुणे रेल्वे प्रशासनाशी संबंधित असल्याचे सांगितले. साबळे यांनी माहिती अधिकाराअंतर्गंत २७ एप्रिल रोजी बी-२ या बोगीतील आरक्षित तिकिटांच्या जागेची माहिती मागविली असता, या बोगीमध्ये ६२ जागांचेच आरक्षण असल्याचे समोर आले. यावर साबळे यांनी ग्राहक मंचात रेल्वे प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली होती. ग्राहक मंचाने साबळे यांनी मांडलेल्या सबळ पुराव्यामुळे, रेल्वेला दोषी ठरवून, ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षा वि. वि. दाणी व ग्राहक तक्रार निवारण मंचच्या सदस्या पूनम. एन. मलिक यांनी १६ आॅक्टोबर रोजी दिलेल्या निकालात वाणिज्य प्रबंधक पुणे यांना साबळे यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी ३५ हजार रुपये दंड ठोठावून ही रक्कम साबळे यांना महिनाभरात देण्याचे आदेश दिले आहेत. महिनाभरात ही रक्कम न दिल्यास त्यावर ९ टक्केदराने व्याज देण्याचे आदेश दिले असल्याचे साबळे यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव