शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यातील अहिरवाडीला चाकूचा धाक दाखवून सव्वा दोन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:04 IST

सोमवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पोळ्याचा करीदिन जागवला

ठळक मुद्देपोलिसात गुन्हा दाखल श्वानपथक पाचारण

रावेर, जि. जळगाव : तालुक्यातील अहिरवाडी येथील रवींद्र चौधरी यांच्या घरात रात्री दरवाजा तोडून आत प्रवेश करीत तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी धारदार चाकूचा व कोयत्याचा धाक दाखवून तब्बल आठ तोळे सोन्याचे दागिने व ८० हजार रूपये रोख असा सव्वा दोन लाख रूपयांचा ऐवज लुटून नेला. अहिरवाडी येथील बाहेरपुऱ्यात ही घटना घडली. रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अहिरवाडी गावातील बाहेरपुरा भागातील रहिवासी रवींद्र चौधरी यांच्या घरात सोमवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास पंचवीशातील तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी दरवाजा ढकलून आत प्रवेश करत त्यांचे हातातील धारदार चाकू व घोड्याच्या नालीच्या आकाराचे कोयत्याचा धाक दाखवून वच्छलाबाई रवींद्र चौधरी, त्यांचे पती रवींद्र व दुसºया खोलीत झोपलेले सून व मुलगा यांचेकडून सोन्याचे राणीहार, टोंगल, बाळ्या, पदकाची सोन्याची पोत अंगठ्या असा आठ तोडे सोन्याची दागिने व ८० हजार रू रोकड घेऊन पोबारा केल्याची खळबळजनक घटना घडली.याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द भादंवि कलम ४५८, ३९२ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फैजपूर पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाकोडे यांनी भेट दिली. फिरते न्यायवैद्यक पोलीस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गांगुर्डे व श्वानपथकही पाचारण करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव