जळगाव शहरातील अशोक मंडोरे यांचे पुत्र मोहन व जावई नीरज बिसानी यांनी इंदूर येथील देवास नाक्यावर बालाजी इंडस्ट्रीज नावाने काथा निर्मितीचा कारखाना सुरू केलेला आहे. मानवाच्या शरीराला घातक असलेल्या केमिकल्सचा वापर करून काथा बनविला जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सुभाष खेडकर व कीर्ती रावत यांनी पोलिसांना सोबत घेऊन या कारखान्यावर सोमवारी धाड टाकली असता, तेथे नीरज बिसानी यांच्या उपस्थितीत पोटॅशियम मेटा बायसल्फेट, चिमोलियम पावडर व टायटेनियम डायऑक्साइड आदींचे मिश्रण करून काथ्याची पेस्ट तयार करून १०० ग्रॅमचे पाऊच तयार केले जात होते. दमयंती आणि बहार नावाने हा ब्रँड बाजारात विक्री केला जातो. घटनास्थळावरून नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.
जळगावच्या व्यावसायिकाच्या कारखान्यावर इंदूरमध्ये धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST