शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

महावीरांच्या विज्ञातूनच समस्यांचे निराकरण शक्य, महावीर जयंतीनिमित्त राहुल कपूर यांचे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 12:08 IST

विविध स्पर्धांमधून महावीर भगवान यांच्या जीवन चरित्राचे दर्शन

ठळक मुद्देस्पर्धांना भरघोस प्रतिसादआत्म्याची शुद्धी महत्वाची

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २८ - आज दहशतवाद, पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होण्यासह सर्वत्र भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण भगवान महावीर यांच्या विज्ञानातून शक्य आहे, असे प्रतिपादन युवा परिवर्तनचे व्याख्याते राहुल कपूर यांनी केले. महावीर जयंतीनिमित्त ‘महावीर का महाविज्ञान’ या विषयावर त्यांचे आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.माजी मंत्री सुरेशदादा जैन, संघपती दलुभाऊ जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल बाफना, कांतीलाल कोठारी, विनोद ठोले, नगरसेवक अमर जैन, समिती प्रमुख दिलीप गांधी आदी उपस्थित होते.कपूर पुढे म्हणाले की, आज भेडसावत असलेल्या या समस्यांबद्दल भगवान महावीर यांनी दिलेला अहिंसेचा संदेश दहशतवादावर मात करू शकतो, पर्यावरणाच्या प्रश्नावर पाणी बचतीची शिकवण मात करू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. या सोबतच त्यांनी बाहेरचे ऐकण्याऐवजी प्रथम स्वत:च्या आतील आवाज ऐका, असेही आवाहन केले.आत्म्याची शुद्धी महत्वाचीआपण एकमेकांचा द्वेश करून आत्म्याला अपवित्र बनवितो. तसे न करता त्याग तपस्या, स्वाध्याय याद्वारे आत्म्याची शु्द्धी होते, त्याचे अनुकरण करा, असे आवाहनही राहुल कपूर यांनी केले.विविध स्पर्धांमधून महावीर भगवान यांच्या जीवन चरित्राचे दर्शनशासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणक महोत्सनानिमित्त आयोजित पाच दिवस कार्यक्रमांतर्गत मंगळवारी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधून सामाजिक संदेशांसह भगवान महावीर यांच्या जीवनचरित्राचेही दर्शन समाजबांधवांनी घडविले.भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मंगळवारी सकाळी पांझरापोळ संस्थान येथे गोमातेला लापसी अर्पण करण्यात आली. या वेळी समिती प्रमुख दिलीप गांधी, मीना मोमाया, रंजन शहा, मंजू ओसवाल, भावना शहा आदी उपस्थित होते.स्पर्धांना भरघोस प्रतिसादबालगंधर्व नाट्यगृहात ‘मांडना’ (सजावट) स्पर्धा, भगवंतांच्या जीवनावरील भेटकार्ड (ग्रिटींग) स्पर्धा, भगवान महावीर यांची पट्टावली (भगवंतांचे भव) स्पर्धा, महावीराष्टक स्तोत्र स्पर्धा झाल्या. त्यांना समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांमध्ये गुरुदेवांची परंपरा, पारंपारिक पद्धती दर्शवून सामाजिक संदेशही दिले.स्पर्धेतील विजेते (अनुक्रमे, प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ, कंसात आयोजक मंडळ) -- ‘मांडना’ (सजावट) स्पर्धा (लूक अ‍ॅँड लर्न) - मेघा छाजेड, स्मिता मुथा, शिवानी कावडिया, शीतल मुनोत, स्नेहा झांबड, आकांक्षा लोढा.- भेटकार्ड (ग्रिटींग) स्पर्धा (जैन महिला मंडळ)- मेघा कावडिया, स्मिता मुथा, अंजली लापसीया, मिताली लुंकड, तेजल जैन, आकांक्षा लोढा.- भगवान महावीर यांची पट्टावली (भगवंतांचे भव) स्पर्धा (श्रद्धा मंडळ) - शिल्पा श्रीश्रीमाळ, रुपल राका, तेजल जैन, रुचिता समदडिया, मनीषा डाकलिया.- महावीराष्टक स्तोत्र स्पर्धा (जेपीपी महिला मंडळ) - तृप्ती रायसोनी, कोमल कावडिया, प्राप्ती कोठारी, ख्याती मुथा, सुमन सिसोदिया.या स्पर्धांसाठी स्मिता धाडीवाल, रिना कुमट, कल्पना सांखला, भावना कचेरिया, प्रियंका मुथा, संगीता फुलपगार, ललिता श्रीश्रीमाळ, कल्पना कटारिया, सपना छोरिया, शिवानी कावडिया, शिवानी रेदासनी, उषा समदडिया, मिनल समदडिया, शीतल जैन, सुरेखा कोटेचा, ममता कांकरिया, पुष्पा बनवट, ललिता कटारिया यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Jalgaonजळगाव