शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रघुनायका सारीखा स्वामी शिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:57 IST

समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधातून मनाला सुरेख मार्गदर्शन केले आहे. सगळे खेळ मनाचेच असतात. प्रपंचातही आपण शांती तीन गोष्टींमुळे गमावून ...

समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधातून मनाला सुरेख मार्गदर्शन केले आहे. सगळे खेळ मनाचेच असतात. प्रपंचातही आपण शांती तीन गोष्टींमुळे गमावून बसतो. भूतस्मरण, भविष्यचिंतन अन् या दोन्हीमुळे वर्तमान विस्मरण. आम्हास वर्तमानात जगताच येत नाही.खरंतर कालचा दिवस हातातून निघून गेला आहे. उद्याचा दिवस आपल्या हातात नाहीे. फक्त आणि फक्त आजचा दिवस आपल्या हाती असतो, तो आम्हास आनंदात घालवायचा आहे. परंतु आम्ही नको त्या भीतीने ग्रासलेलो असतो आणि आनंद गमावून बसतो. नसलेल्या भितीचे दोर आम्ही स्वत:च्या गळ्याभोवती बांधून घेतो ते नसलेले दोर, आम्हास सोडायचे आहे..राज्यस्थानातल्या वाळवंटात काही लोकांचा काफिला, आपल्या उंटासह रात्री मुक्कामाला थांबतो. एका उंटाला बांधण्यासाठी ठोकायला खुंटीही नसते अन् दोरही नसतो. उंटाला बांधले नाही तर तो रात्रीतून कुठेतरी निघून जाईल, या काळजीत सगळे असतात. एक वृध्द व अनुभवी व्यक्ती सांगते की, सोपा उपाय आहे. त्या उंटासाठी नसलेली खुंटी ठोका अन् नसलेला दोर त्याच्या गळ्याभोवती बांधल्यासारखे करा. सग्ळ्यांना आश्चर्य वाटते. त्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे, नसलेला खुंटा जमिनीत ठोकल्यासारखे केले जाते अन् नसलेला दोर त्या उंटाच्या गळ्याभोवती बांधल्यासारखे केले जाते.दुसऱ्या दिवशी बाकी सगळे उंट पुढच्या प्रवासासाठी जाण्यास निघतात. परंतु हा उंट काही जागचा उठत नाही. यावर अनुभवी वृध्द व्यक्ती सांगते की, या उंटासाठी जी नसलेली खुंटी ठोकलेली आहे आणि नसलेला दोर जो त्याच्या गळ्याभोवती बांधला आहे, ती खुंटी आणि दोर सोडल्यासारखे करा. त्याप्रमाणे केले जाते. उंट ताबडतोब जागीचा उठतो आणि पुढचा प्रवास सुरु होतो.आम्हीसुध्दा भीतीचे नसलेले दोर आमच्याभोवती बांधून घेतले आहेत आणि त्यामुळे आपण शांती गमावून बसलो आहोत. आम्हालासुध्दा भीती, चिंता, काळजीचा नसलेला खुंटा आणि गळ्याभोवती बांधलेला दोर काढायचा आहे. तरच आनंदात जगता येईल. त्यासाठी सद्गुरुनाथांना शरण जायला हवे. अनिती, अधर्माने न वागता, गुरुंनी दिलेल्या नामाचे स्मरण करायला हवे. तरच नसलेल्या भीतीचे दोर गळ्याभोवतीचे सोडले जातील.- राया महाराज उपासनी, निजामपूरकर.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव