आर. आर. विद्यालयात मराठी भाषा पंधरवाड्याला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:19 AM2021-01-19T04:19:50+5:302021-01-19T04:19:50+5:30

रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी जळगाव : शिवाजीनगरातील दुध फेडरेशनच्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून, वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा ...

R. R. Marathi language fortnight begins in school | आर. आर. विद्यालयात मराठी भाषा पंधरवाड्याला सुरूवात

आर. आर. विद्यालयात मराठी भाषा पंधरवाड्याला सुरूवात

Next

रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी

जळगाव : शिवाजीनगरातील दुध फेडरेशनच्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून, वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली असून, मनपाने रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.

विक्रेत्यांनी मांडले दुकानासमोर अतिक्रमण

जळगाव : फुले मार्केटमधील काही विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोरच दुकानाचे साहित्य व वाहने उभे करुन अतिक्रमण केल्यामुळे दररोज वाहतुक कोंडी उद्भवत आहे. यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

उघड्यांवरील खाद्य पदार्थ विक्रीमुळे आरोग्याला धोका

जळगाव : शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांलगत खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्या थाटत आहेत. मात्र, विक्रेत्यांकडून या अन्न पदार्थांवर सुरक्षिततेसाठी काळजी करण्यात येत नसून, उघड्यावरच विक्री करण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी आरोग्य विभागाने या विक्रेेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

जळगाव आगारात वाहतुक सुरक्षा अभियानाला सुरुवात

जळगाव : परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारात ३० वर्ष विना अपघात सेवा पार पाडलेल्या शेखर सपकाळे यांच्याहस्ते सुरक्षित वाहतुक अभियानाला सुरूवात करण्यात आली. १७ फेब्रुवारी पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे, नीलेश पाटील, वाहतूक अधिक्षक मनोज तिवारी, एस. डी. महाजन इतर कामगार वर्ग उपस्थित होते. सुत्रसंचालन सिद्धार्थ चंदनकर यांनी तर आभार एस. डी. सोनार यांनी मानले.

Web Title: R. R. Marathi language fortnight begins in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.