शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

जळगावातील समांतर रस्त्याचा प्रश्न : ‘नही’च्या एककल्ली कारभारामुळे असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:26 IST

माहिती ठेवली जातेय गोपनीय

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींकडून श्रेयाच्या नादात चुकीची माहिती

जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या डीपीआर मंजुरीच्या प्रक्रियेबाबत सातत्याने सुरू असलेला घोळ व त्यातच ‘नही’कडून (राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणकडून) सुरू असलेला एककल्ली कारभारामुळे जनमानसात विनाकारण असंतोष पसरत आहे. ‘नही’ने लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतलेले नसल्याने लोकप्रतिनिधींकडूनही श्रेय घेण्याच्या नादात चुकीची माहिती पसरविली जात आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या चुुकीमुळेच गोपनीय पत्र उघड होऊन या समांतर रस्त्याच्या ‘डीपीआर’चा अजूनही घोळ सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.‘डीपीआर’मध्ये तीनवेळा बदलगेल्या काही वर्षांपासून या समांतर रस्त्यांचे काम डीपीआर मंजुरीच्या घोळातच अडकले आहे. एखाद्या कामासाठी तीन-तीन वेळा डीपीआरमध्ये बदल करीत वर्षानुवर्ष कसे घालविले जातात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. शहरातून जाणारा हा महामार्ग अत्यंत धोकादायक बनला असून निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना ‘नही’कडून कासवगतीने काम सुरु असल्याचे यावरुन स्पष्ट दिसते.कधीपर्यंत कागदपत्रे रंगविणार?१३९ कोटींच्या डीपीआरला मंजुरी अंतीम टप्प्यात असताना ‘नही’च्या मुख्य महाव्यवस्थापक (तांत्रीक) यांनी जळगावला भेट देऊन तपासणी (इन्स्पेक्शन) केले. त्यात त्यांनी डीपीआरमध्ये बदल सुचविले. त्यामुळे पुन्हा सुधारीत डीपीआर करून तो आधी नागपूर कार्यालय व व तेथून दिल्ली मुख्यालयात पाठविण्यात आला. त्यानंतरही मुख्य महाव्यस्थापकांनी सांगितलेल्या मुद्यांपैकी काही मुद्यांचा समावेश नसल्याने त्या मुद्यांचा समावेश करून सुधारीत अहवाल १५ दिवसांत सादर करण्याच्या सूचना नागपूर विभागीय कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. ती पूर्तता झाल्यानंतरच अंतीम मंजुरी मिळेपर्यंतच्या काळात निविदा मागविण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्या निविदा मंजुरी या डीपीआरच्या अंतीम मंजुरीनंतरच होणार आहे. तेच पत्र खासदार ए.टी. पाटील यांनी प्रसिद्धीस देत डीपीआर मंजुर झाल्याचा आभास निर्माण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तसेच सोशल मिडियावर स्वत:ची पाठ थोपटून घेतल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, नही कधीपर्यंत कागदपत्रांचा हा खेळ सुरु ठेवले? असा प्रश्न आहे.‘नही’च्या अधिकाºयांपुढे लोकप्रतिनिधींचेही काही चालेना...या सर्व घोळातून एक बाब स्पष्ट झाली आहे की, भाजपाच्या लोकप्रतिनिधी, राज्यातील, केंद्रातील मंत्री यांचेही ‘नही’च्या अधिकाºयांपुढे काहीच चालत नाही. ‘नही’च्या अधिकाºयांना त्यांना अपेक्षित असल्यानुसारच डीपीआर करून हवा आहे. हा समांतर रस्ता करताना सर्वच समस्या मार्गी लावण्यासाठी राज्य तसेच स्थानिक संबंधीत विभाग, रेल्वे यांच्याशी समन्वय साधून त्यांची मदत घेण्याची सूचना करण्यात आली आहे, दिरंगाई टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने हे काम करण्याचेही नहीच्या प्रशासनाने सूचित केले आहे.पहिल्या टप्प्यात अंडरपास व चौकांची कामे, रस्ता रूंदीकरण, त्यानंतर रेल्वे व इतर अ‍ॅथॉरिटी आल्यानंतर रस्ता रूंदीकरणाच्या संदर्भात कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य महाव्यवस्थापक अतुल कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार काम होण्यासंदर्भात २९ आॅगस्ट २०१८ रोजी जळगाव ‘नही’ कार्यालयाने नकाशे व अंदाजपत्रक सादर केले. मात्र ते अचूक व बरोबर नसल्याचा उल्लेख १ आॅक्टोबर व १९ नोव्हेंबरच्या पत्रात आहे. मात्र भाजपाच्या लोकप्रतिनिधी या पत्राचा, अहवालांचा अभ्यास व त्यानुसार पाठपुरावा करत नसल्याने काम लांबत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये रोष वाढत चालला आहे. येत्या काही दिवसात निवडणुका होणार असल्याने लोकप्रतिनिधींचाही श्रेयासाठी खटाटोप सुरु आहे.‘नही’ने विश्वासात घेतले असते तर...‘नही’कडून हे सर्व प्रक्रिया गोपनियपद्धतीने सुरु आहे. त्यांच्याकडून लोकप्रतिनिधी, समांतर रस्ते कृती समिती, जिल्हा प्रशासन यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे असंतोष निर्माण होत आहे. जर ‘नही’ने आतापर्यंत विश्वासात घेत त्यांच्याकडून सुरु असलेल्या प्रक्रियेबाबत माहिती दिली असती तर संभ्रमही निर्माण झाला नसता. लोकप्रतिनिधींनाही काय चालले आहे, याची माहिती नसल्याने ते अपूर्ण माहितीच्या आधारावर श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कालच्या प्रकारावरुन स्पष्ट झाले. हे काम लवकर व्हावे ही नागरिकांची अपेक्षा आहे.

टॅग्स :highwayमहामार्गJalgaonजळगाव