शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींच्या प्र. मा. चे अधिकार आता बीडीओंना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 20:46 IST

निर्णय : जिल्ह्यात दोन वर्षांत २११ विहिरींना मंजुरी

जळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींच्या प्रशासकीय मान्यतेचे अधिकार आता गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, तसा शासन निर्णय ४ मार्च रोजी काढण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत २०११ सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. प्रस्ताव आल्यानंतर तालुका पातळीवरून सर्व प्रक्रिया ऑनलाईन होत, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळत असे. त्यामुळे जसे प्रस्ताव जि. प. कडे आले तसे मंजूर झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.तालुकास्तरावरच प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असल्याने जि. प. मनरेगा विभागाकडून हे प्रस्ताव स्थानिक पातळ्यांवर पाठविण्यात आले आहेत. पूर्वी सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाच होते. मात्र, आता नव्या शासन निर्णयानुसार हे अधिकार आता गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत.काय आहेत निकषवैयक्तिक सिंचन विहिरींसाठी संबंधिताकडे ६० आर जमीन हवी, एमआरजीएसचे जॉब कार्ड हवे, वार्षिक आराखड्यात नाव हवे, पूर्वीची विहीर नको, एका विहिरीपासून दीडशे मीटर, तर सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीपासून ५०० मीटर अंतर हवे, असे सिंचन विहिरींसाठी निकष आहेत.मंजूर झालेले प्रस्ताव२०१९ -२० : १०५ विहिरींना मंजुरी२०२०-२०२१ : १०६ विहिरींना मंजुरी२०६ गावांनाच मंजुरीभूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या निर्देशानुसार आता जिल्ह्यात २०६ गावांत सिंचन विहिरींना मंजुरी देता येणार आहे. डिसेंबर २०२० मध्ये याबाबत पत्र प्राप्त झाले आहेत. ज्या गावांमध्ये भूजल वापर ६० टक्क्यांपेक्षा कमी अशाच गावांना या मंजुरी भेटणार असून यासह शोषित, अतिशोषित आणि अंशत: शोषित अशा गावांना आता ही मंजुरी देता येणार नसल्याचे नरेगाचे गटविकास अधिकारी मनोज धांडे यांनी सांगितले.आता स्थानिक पातळ्यांवरच मान्यतेचे अधिकार असल्याने प्रस्ताव तालुकास्तरावरच असतात. तालुकास्तरावरून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे विविध माध्यमातून मंजुरी मिळत असते. मुख्य कार्यकारी अधिकारी हे अंतिमत: मंजुरी देत असत, आता नव्या शासन निर्णयानुसार गटविकास अधिकारी यांना हे अधिकार देण्यात आले आहेत. आपल्याकडे जेवढे प्रस्ताव आले त्यांना आपण मंजुरी दिली आहे.- मनोज धांडे, गटविकास अधिकारी, नरेगा

 

टॅग्स :Jalgaonजळगाव