शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वीज कनेक्शन कापायला गेलेल्या वायरमनला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 17:33 IST

वीज बील थकल्यामुळे वीज कनेक्शन कापायला गेलेल्या वायरमनला धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी १०.१५ वाजता विटनेर, ता.जळगाव येथे घडला. याप्रकरणी वायरमन अमोल विष्णू भागवत (३०, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन योगेश रमेश वराडे याच्याविरुध्द एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविटनेर येथील घटना  कर्मचारी व थकबाकीदार संघर्ष वाढलाएमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद 

जळगाव : वीज बील थकल्यामुळे वीज कनेक्शन कापायला गेलेल्या वायरमनला धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी १०.१५ वाजता विटनेर, ता.जळगाव येथे घडला. याप्रकरणी वायरमन अमोल विष्णू भागवत (३०, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन योगेश रमेश वराडे याच्याविरुध्द एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरण कंपनीच्या अधिका-यांनी दररोज पाच वीज थकबाकीदारांचे कनेक्शन कापण्याचे आदेश वायरमन व शाखा अभियंत्यांना दिले आहेत. कनेक्शन कापले नाही तर संबंधित कर्मचा-याचे वेतनच रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे वायरमन विष्णू भगत हे रविवारी सकाळी सहका-यांसह वावडदा कार्यक्षेत्रातील विटनेर येथे थकबाकीदारांकडे गेले असता योगेश वराडे यांचे कनेक्शन कापण्याच्या तयारीत असताना कुटुंबाने वाद घातला. भगत यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली. याप्रकारामुळे तालुक्यातील १० ते १५ वायरमन एकत्र येऊन एमआयडीसी पोलिसात आले होते. त्यांनी वराडे याच्याविरुध्द तक्रार दिली.प्रशासनाच्या निर्णयाला कर्मचा-यांचा विरोधएमआयडीसी पोलिसात आलेल्या कर्मचा-यांनी महावितरण प्रशासनाच्या निर्णयालाही विरोध दर्शविला. एखादी थकबाकीदार जागेवर थकबाकी भरत असेल तरीही त्या ग्राहकाचे वीज कनेक्शन कापले जात आहे, त्यामुळे ग्राहक व कर्मचारी यांच्यात वाद उद्भवत आहेत. कनेक्शन कापले नाही तर वेतन रोखले जाणार असल्याने कर्मचा-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. धुळे जिल्ह्यात उन्हामुळे सकाळी ७ ते १०.३० या वेळेत वसुली व कनेक्शन कापण्याची मोहीम राबविण्याचे आदेश स्थानिक अधिका-यांनी दिले आहेत. जळगावात मात्र भर उन्हात कर्मचा-यांना पोलवर चढून कनेक्शन कापण्याचे आदेश आहेत. वातानुकुलित यंत्रात बसणा-या अधिका-यांकडून तडपत्या उन्हात कर्मचा-यांकडून काम करुन घेतले जात असल्यानेही कर्मचा-यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव