शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीना सव्वादोन लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:38 IST

३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीस तीन हजार २०० याप्रमाणे यावल तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींना दोन लाख १४ हजार ४०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसामाजीक वनिकरण विभागाच्या रोपवाटिकेतून रोपे पुरविली जाणाररोपवाटिकेत चार लाख रोपे तयारग्रामपंचायतींना सामाजिक वनिकरण विभाग रोपे पुरविणार

यावल, जि.जळगाव : ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीस तीन हजार २०० याप्रमाणे तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींना दोन लाख १४ हजार ४०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी किशोर सपकाळे व सहा. कार्यक्रम के.ए.मोरे यांनी दिली.ही वृक्ष लागवड रस्त्याच्या दुतर्फा, स्मशानभूमी, गावठाण यासह पडीक जमिनीवर करायची आहे. ग्रामपंचायतींना सामाजिक वनिकरण विभागाकडून रोपे पुरविली जातील.सामाजिक वनिकरण विभागाच्या लागवड अधिकारी प्रज्ञा वडमारे यांनी सांगितले की, सामाजिक वनिकरणकडून दोन लाख १४ हजार ४०० रोपे पुरविण्यात येणार आहेत.रोपवाटिकेत उपलब्ध असलेली रोपे- बांबू ४१ हजार ८००, शिसे ५५ हजार २००, आवळा १९ हजार ८००, खैर सहा हजार ५००, निंब एक हजार, फापडा एक हजार ६००, शिवण दोन हजार २०० अशी एकूण १ लाख ५० हजार वृक्षांची रोपे उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीची सुमारे ६० हजार लहान रोपे शिल्लक आहेत. तसेच विरावली व अन्य एका ठिकाणच्या रोपवाटिकेतही रोपे आहेत. त्यात गुलमोहर, सोनमोहर, आवळा, निम, सीताफळ, अंजन, जांभुळ, बदाम, काशीद, सिसम, रेन्द्री या रोपांचा समावेश आहे. सामाजिक वनीकरणच्या या रोपवाटीकेत कार्यरत वरिष्ठ असलेले वनपाल डी.बी. तडवी, वनपाल अशोक पाटील यांच्यासोबतच वनमजूर जी.बी. बाविस्कर, एम.एस. सावकारे, एस.एन. पिंजारी उच्च तापमानातही रोपांचे संगोपन करीत आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल