शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

डाळींच्या उत्पादनात २५ टक्क्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:42 IST

कडधान्याची आवक घटली

ठळक मुद्देकमी पावसाचा परिणामआयात बंदीची भर

जळगाव : कमी पावसामुळे कडधान्याची आवक घटल्याने त्याचा फटका दालमिललादेखील बसू लागला असून आतापासूनच दालमिलचे उत्पादन तब्बल २५ टक्क्याने घटले आहे. त्यात विदेशातून होणारी कच्च्या मालाची आवकही बंद असल्याने डाळ उत्पादनावर मोठा परिणाम होऊन डाळींचे भावदेखील वाढू लागले आहे. सलग तीन आठवड्यांपासून डाळींचे भाव वाढतच असून या तीन आठवड्यात डाळींचे भाव थेट ८०० ते ९०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. उडीद, मुगाला शेवटच्या टप्प्यात पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने दालमिलमध्ये कच्च्या मालाची चणचण भासू लागली आहे.उत्पादन ७५ टक्क्यांवरदेशातील डाळ उत्पादनात जळगावचा मोठा वाटा असून येथील डाळ देशातील विविध भागासह विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यामुळे येथील औद्योगिक वसाहतीमधील डाळ उद्योग हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र यंदा वरुणराजाच्या अवकृपेने या उद्योगावर मंदीचे ढग ओढावले जात आहे. जळगावात दररोज साधारण ५ हजार क्विंटल डाळीचे उत्पादन होते. मात्र सध्या कडधान्याची आवक घटल्याने या उत्पादनात थेट २५ टक्क्याने घट झाली आहे. ५ हजार क्विंटलपैकी आता दररोज ३७०० ते ३७५० क्विंटल डाळीची निर्मिती होत आहे.आयात बंदीची भरदेशात एकतर कडधान्याचे उत्पादन कमी आल्याने त्यात विदेशातून येणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी असल्याने कच्च्या मालाची कमतरता भासण्यास अधिकच मदत होत आहे. त्यामुळे या सर्वांचा जळगावातील ५५ ते ६० दालमिलला फटका बसत आहे. परिणामी दालमिलचालक चिंतीत झाले असून २००६मधील निर्यातबंदी नंतर झालेल्या स्थितीची आठवण या निमित्ताने दालमिल चालकांना होत आहे.मागणी वाढलीपावसाळ््यामध्ये डाळींना मागणी कमी असल्याने तिचे भावदेखील स्थिर होते. मात्र सध्या आवक कमी असताना मागणीही वाढल्याने डाळींचे भाव वाढण्यास अधिक मदत होत आहे. कमी पावसामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामावरही परिणाम होण्याची चिन्हे असल्याने रब्बी हंगामातील हरभºयाच्या उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचे संकट दालमिलवरदेखील राहणार असल्याचे सांगितले जात आहे.मोठी भाववाढतीन आठवड्यांपूर्वी ६२०० ते ६६०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७१०० ते ७६५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीतही ५५० ते ६०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ४७०० ते ४८०० रुपयांवरून ५३०० ते ५३५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. अशाच प्रकारे ५२०० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५४०० ते ५५५० तर तूरडाळदेखील ५५०० ते ६००० रुपये प्रती क्विंटलवरून ५७०० ते ६१५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.कडधान्याची आवक घटल्याने दालमिलमधील उत्पादन २५ टक्क्याने कमी झाले आहे. त्यात कच्च्या मालाची आयात बंद असल्याने अधिकच परिणाम होत आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.डाळींची आवक कमी व मागणी जास्त असल्याने डाळींचे भाव वाढत आहे. त्यात उडीद व मुगाच्या डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव