शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

५८ कोटींच्या निधीतून प्रत्येक नगरसेवकांसाठी ५० लाखांची तरतूद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 10:17 IST

Jalgaon : चार वर्षांपूर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून आता कुठे कामांना सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे या सर्व १०० कोटीच्या निधीतून केवळ रस्त्यांची कामे केली जाणार असून, पावसाळ्याच्या आधी ४२ कोटींच्या निधीतून मुख्य भागातील रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

जळगाव : महापालिकेला नगरोत्थानांतर्गत मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून एकीकडे ४२ कोटी रुपयांच्या निधीचा प्रश्न मार्गी लागत असताना, दुसरीकडे उर्वरित ५८ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांचा प्रस्ताव येत्या महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांचा भागातील कामे मार्गी लावण्यात यावी यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागातील कामांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे मुख्य भागातील रस्त्यांसह आता कॉलनी भागातील रस्त्यांच्या ही प्रश्न मार्गी लागणार आहे.

चार वर्षांपूर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून आता कुठे कामांना सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे या सर्व १०० कोटीच्या निधीतून केवळ रस्त्यांची कामे केली जाणार असून, पावसाळ्याच्या आधी ४२ कोटींच्या निधीतून मुख्य भागातील रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. तर पावसाळ्यानंतर शहरातील कॉलनी भागातील रस्त्यांची कामे केली जाणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली. येत्या महासभेत ५८ कोटींतून होणाऱ्या कामांचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून, या कामांची अंतिम यादी तयार करण्याचे काम महासभेत सुरु आहे.

५ कोटींच्या निधीला मान्यता, ५८ कोटीत भाजपला ही मिळाले स्थान१५ डिसेंबर रोजी झालेल्या महासभेत भाजप नगरसेवकांनी प्रभाग क्रमांक १० मध्ये होणारे ५ कोटींचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बहुमताने या विषयाला स्थगिती दिली होती. भाजपला महासभेत बहुमत असल्याने या विषयाला मंजुरी मिळणे कठीण असल्याने, शिवसेनेने ५८ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामामधून भाजप नगरसेवकांचे प्रस्ताव वगळून हा विषय महासभेत न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. भाजपची ५८ कोटींच्या निधीवरून कोंडी केल्यानंतर भाजपनेही नमते घेऊन, १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत भाजपने ५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यामुळे शिवसेनेने देखील भाजपला ५८ कोटींच्या निधीत स्थान दिले आहे.

महासभेत १६० विषय मंजुरीसाठी५८ कोटींच्या निधीतील कामांना मंजुरी देण्यासोबत जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून होणारी कामे, दलित वस्ती सुधार निधी व मनपा अंदाजपत्रक सादर करण्यासोबत सुमारे १६० विषयांचे प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महासभेत एवढ्या मोठ्या प्रमाणात विषय मंजुरीसाठी ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव