शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांना माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्या : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 21:56 IST

लोकहित को.आॅप हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर ला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान

ठळक मुद्देलोकहित को.आॅप हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरची सहकार विभागाकडे नोंदणीसहकार राज्यमंत्र्यांकडून आवश्यक त्या मदतीचे आश्वासनसहकार राज्यमंत्र्यांचे हस्ते नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १६ - लोकहित को.आॅप हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर ने सर्वसामान्य रुग्णांचे लोकहित जोपासून त्यांना माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात केले.उत्तर महाराष्ट्रात प्रथमच सुरु होणाºया लोकहित को.आॅप हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरची नोंदणी सहकार विभागाकडे करण्यात आली आहे. या सेंटरला नोंदणी प्रमाणपत्र सहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, सेंटरचे मुख्य प्रवर्तक डॉ.एस.एस.राणे यांचेसह प्रवर्तक सुनील पाटील, डी.एन.पाटील, छबीलदास शहा, यु.डी.चौधरी, एन.एस.पाटील, डॉ.प्रताप जाधव, संजय शहा, अरुण भारंबे, धनाजी राणे, डॉ. सुरेश राणे उपस्थित होते.गुलाबराव पाटील म्हणाले की, सध्याच्या काळात सर्वसामान्यांना नागरीकांना माफक दरात आरोग्यसेवा मिळतांना अडचणी येतात. ही अडचण लक्षात घेऊन जळगावातील मान्यवरांनी एकत्र येऊन आरोग्य, सेवा आणि सहकार या त्रिसुत्रीवर आधारित या उपक्रमाला सुरुवात केली आहे. या सेंटरच्या माध्यमातून सामाजिक भावना जोपासून व लोकहित नजरेसमोर ठेवून गोरगरीब जनतेला अत्यल्प दरात आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावी. त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी केले. मुख्य प्रवर्तक डॉ.राणे म्हणाले की, संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांकरीता मोफत जेवण व निवास व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचबरोबर संस्थेचे १८ हजार ग्रंथ व पुस्तके असलेले पॉल हॅरिस सुसज्ज ग्रंथालय व लोकहित वाचनालय आहे. त्याचबरोबर संस्थेच्यावतीने जिल्ह्यात सात लोकहित दवाखाने, ७ माफक दरातील लोकहित जेनरिक मेडिकल व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता आर्थिक मदत करण्यासाठी लक्ष्मीबाई कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी सहाय्य योजना हे उपक्रम राबविण्यात येत आहे. आता गोरगरीब नागरिकांना माफक दरात उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी लोकहित को.आॅप हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरची नोंदणी केली असून या सेंटरच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला अत्यल्प दरात उपचार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सुत्रसंचलन एम.पी.देवरे यांनी केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव